श्रीकांत टिकोळे यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीशा मेडिकल कराड तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन..
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : श्रीकांत टिकोळे यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीशा मेडिकल कराड तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यशवंतराव चव्हाण ब्लड बँक,सुपर मार्केट येथे या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. कोरोनाच्या काळात जगासमोर रक्ताचा तुटवडा खूप भासत होता,महामारीच्या काळात रक्ताला सोन्यापेक्षा जास्त भाव होता. आणि रक्त न मिळाल्याने काहीना आपला जीव गमवावा लागला होता.आज जरी जग पूर्व पदावर आले असले तरी अजून त्या खुणा पाठ सोडत नाहीत. नेमका हाच धागा पकडून श्रीकांत टिकोळे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन शहराच्या केंद्रभागी असलेल्या यशवंतराव चव्हान ब्लड बँकेत केले होते.’आपल्याला समाजाचे काहीतरी देणे लागते’ या सुंदर भावनेतून त्यांनी हे शिबिर घेतले.

या रक्तदान शिबिराला प्रचंड असा प्रतिसाद कराडवासीयांनी व आजूबाजूच्या लोकांनी दिला.श्रीकांत टिकोळे मित्रपरिवार व श्रीशा मेडिकल त्यांच्या आयोजनामुळे आज रक्तदान शिबिर पूर्णपणे यशस्वी होण्यास मदत झाली. आजच्या धकाधकीच्या जीवनात कुणाला श्वास घ्यायला ही उसंत नाही. पण तरीही लोकांनी आपल्या वेगवान व धावपळीच्या जीवनशैलीतून वेळ काढून रक्तदान केले व आपले कर्तव्य पार पाडले. “प्रत्येक व्यक्तीने रक्तदान करावे, ते शरीरासाठी खरच आवश्यक आहे.” व त्याचा कोणताही दुष्परिणाम शरीरावर होत नाही, असे मत श्रीकांत टिकोळेयांनी व्यक्त केले.यावेळी सातारा जिल्हा केमिस्ट असोसिएशन सातारा, अध्यक्ष. सागर पाटील, हेमंत मोरे: भाग्यश्री मेडिकल, अनिस मनेर:बाबा मेडिकल, मलकापूर, व समस्त श्रीकांत टिकोळे मित्र परिवार यावेळी उपस्थित होते.




















