कोयनानगर (प्रतिनीधी) – संजय डुबल- सद्यस्थितीत समाजा मध्ये वाढती व्यसनाधिनता ही देशापुढील गंभीर समस्या असून युवा पिढी व्यसनांच्या आहारी जात आहे व्यसनामुळे अनेक कुटुंब उध्वस्त झालेली आपण उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत. व्यसनमुक्त भारत घडविण्यास प्रत्येक नागरीकांनी पुढाकार घेतल्यास भारत व्यसनमुक्त होण शक्य आहे. व्यसन हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू असून त्याचे दुष्परिणाम लवकर लक्षात येत नाहीत. योग्य मार्गदर्शन व आमच्या फॉर्म्युल्याने कोणत्याही साईड इफेक्ट शिवाय व्यसनातुन मुक्त होता येते. व्यसनमुक्ती ही काळाची गरज बनली असून पाटण येथील डॉ. बळीराम लादे यांनी सुरू केलेल्या व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून लोकांनी व्यसनमुक्त व्हावे. तसेच संस्थेचे विस्तार अधिकारी अथवा पी आर.ओ. यांचेशी संपर्क करून आपले, कुटुंबातील, अथवा परिचित व्यक्तीस व्यसनमुक्त करावे. संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत तीन लाख जन व्यसनमुक्त झाले असून संस्थेच्या वतीने व्यसनमुक्त व मधुमेह मुक्त भारत अभियान संपूर्ण भारतभर राबवले जात आहे, असे मत समर्थ सोशल फाऊंडेशन जनरल हॉस्पिटल,आणि न्युट्रीफिल हेल्थ प्रॉडक्टस प्रायव्हेट लिमिटेड व सारंग निसर्ग उपचार केंद्र पाटण यांचे संयुक्त विद्यमाने सूरू केलेल्या पाटण (रामापुर ) येथे व्यसनमुक्ती सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी संस्थापक अध्यक्ष सादिक शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सारंग निसर्गोपचार केंद्र पाटणच्या वतीने व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्त भारत अभियान केंद्राचे उद्घाटन पाटण नगरपंचायतीच्या नगराअध्यक्षा सौ.मंगल कांबळे यांच्या हस्ते पार पडले यावेळी निवासी नायब तहसिलदार प्रशांत थोरात, संजय गांधी योजनेचे नायब तहसिलदार तुषार बोरकर, समर्थ सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा.सादिक शेख व पाटण केंद्राचे डॉ. बळीराम लादे व सौ अलका लादे व नगरसेविका उपस्थित होत्या. यावेळी पाटणचे निवासी नायब तहसिलदार प्रशांत थोरात, यांनी व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती बाबत. सविस्तर माहीती घेऊन संस्थेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या व्यसनमुक्त भारत अभियानाचं मनोगत व्यक्त करताना कौतुक केले. नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष सागर पोतदार यांनीही उपक्रमाचं कौतुक करत आपले मनोगत व्यक्त केले.
या व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्त भारत अभियान केंद्राचे उद्घाटन सोहळा निमित्त समर्थ सोशल फाउंडेशन चे संचालक अस्लम शेख, संचालक सुहास पाटील त्याचप्रमाणे विस्तार अधिकारी नामदेव माने, आयुब पठाण, कादर आगा, तसेच पाटण नगरपंचायतीच्या नगरसेविका सौ.अनिता देवकांत, नगरसेविका सौ संजना जवारी, नगरसेविका मिनाज मोकाशी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पाटण तालुका अध्यक्ष प्राणलाल माने, सौ अलका लादे, डॉ. निलम मुल्ला, लाला इनामदार, सुधाकर देवकांत, आनंदा कांबळे, शशिकांत देवकांत, फारुख भाई मोकाशी, विठ्ठल रखुमाई पतसंस्था चे व्यवस्थापक तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी समर्थ सोशल फाउंडेशन चे विस्तार अधिकारी विजय थोरवडे यांनी प्रास्ताविक केले तर विस्तार अधिकारी संजय डुबल यांनी उपस्थितांचे स्वागत केले. पी. आर.ओ. शंकर भिसे, विलास आगाशे , रतन शिरसाठ, सौ. आशा थोरवडे आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यास परीश्रम घेतले.