मुंबई प्रतिनिधी :- सुखविंदर सिंग अप्पर पोलीस महासंचालक आस्थापना निवृत्त होऊन दोन महिन्यांचा कालावधी ओलांडला तरीही अतिरिक्त पोलीस महासंचालक आस्थापना हे पद रिक्त आहे.सुखविंदर सिंग हे दिनांक 31 जुलै 2025 रोजी निवृत्त झाले आहेत निवृत्त होण्या अगोदर त्यांना ए डी जी आस्थापना या पदावरून डीजी आस्थापना हे पद उन्नत करून पदोन्नती देण्यात आलेली होती आता सुखविंदर सिंग हे निवृत्त होऊन दोन महिन्यांचा कालावधी ओलांडला असला तरी अतिरिक्त पोलीस महासंचालक स्थापना या पदावर कोणाचीही पदस्थापना करण्यात आली नाही एडीजी आस्थापना हे अति महत्त्वाचे पद असून अख्ख्या महाराष्ट्राच्या पोलिसांच्या बाबतीत पदोन्नती ट्रान्सफर कोर्ट केसेस असे महत्त्वाच्या विषयांवर निर्णय घेतात परंतु हे पद रिक्त असल्यामुळे असे महत्त्वाचे निर्णय घेण्यास विलंब होत आहे असे दिसून येते आहे. एडीजी आस्थापना व्यतिरिक्त आणखी अति महत्त्वाची पदे ही महाराष्ट्र पोलीस दलात रिक्त असल्याचे चित्र दिसय आहे.एडीची ट्रेनिंग ए डी जी पे अँड सी महाराष्ट्रात होणाऱ्या इलेक्शन मुळे ही पदे रिक्त ठेवली आहेत का असा प्रश्न आता निर्माण होत आहे .संजीव कुमार सिंगल हे एडीजी आस्थापना वेळी जो कामाचा ओघ दिसून येत होता .तो आता संपूर्णतः मंदावलेला दिसत आहे. संजय कुमार सिंगल यांनी ए डी जी आस्थापना यांनी त्यांच्या काळात लोकसभा इलेक्शनच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात बदल्या केल्या होत्या व त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोर्ट केसेस झालेले होते तरीही संजीव कुमार सिंगल यांनी ती सर्व प्रकार ने यशस्वीरित्या हाताळली होती तशाच अधिकाऱ्याची एडीजी आस्थापना अशा अति महत्त्वाच्या पदावर नियुक्ती होणे क्रमप्राप्त असल्याचे बोलले जात आहे.






















