
प्रतिनिधी/फलटण
आज दि.01/12/2025 रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून पुकारलेल्या काटा बंद आंदोलनास तालुक्यातील शेतकऱ्यांचा उत्सुर्त प्रतिसाद मिळाला आणि सर्व शेतकरी बांधवांनी साखरवाडीच्या श्री दत्त इंडिया साखर कारखाना तेथे वजन काटा वर ताबा घेऊन वजन काटे बंद करून कारखाना बंद पाडला
श्री दत्त इंडिया साखर कारखान्याचे शेतकी अधिकारी पाटील यांनी आंदोलन पाठीमागे घेण्यास विनंती केली परंतु सर्व शेतकऱ्यांना 3300 दर अमान्य असून 3500 दर निश्चित करावा व तसा लेखी पत्र द्यावे अशी स्वाभिमानी शेतकरी संघटने कडून मागणी केली व त्याशिवाय हे आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका घेतली सर्व शेतकरी वजन काटा वर सकाळ पासून बसून होते
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य युवा अध्यक्ष अमरसिंह कदम,सातारा जिल्हा अध्यक्ष धनंजय महामुलकर,
फलटण तालुकाध्यक्ष नितीन यादव,
राज्य प्रवक्ते प्रमोद गाडे, जिल्हा सरचिटणीस डॉ. रवींद्र घाडगे,पक्ष फलटण तालुकाध्यक्ष दादा जाधव,साखरवाडी विभाग प्रमुख किरण भोसल,नाना शिपकुले, सूरज दादा साळुंखे व तालुक्यासह साखरवाडी परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते





























