बुद्धेहाळ वार्ताहर : ज्येष्ठ समाज सेविका मंगल लवटे यांच्या पुढाकाराने बुद्धेहाळ येथे हनुमान मंदिर परिसरात दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ ते सायं. ५ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या नेत्र तपासणी व आरोग्य सेवा उपक्रमाला ग्रामस्थांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाचा ४०० पेक्षा अधिक नागरिकांनी लाभ घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रभावी आणि ऊर्जावान समाजसेवक व युवा नेते सचिन लवटे यांच्या सूत्रसंचालनाने झाली. त्यांच्या निवेदनामुळे कार्यक्रमात उत्साह, शिस्त आणि स्पष्ट संदेश पोहोचला.प्रारंभी मान्यवर म्हणून माझी सरपंच संजय जावीर & बाबासाहेब हिप्परकर , माझी चेअरमन महादेव लवटे, प्रगतशील बागायतदार संजय हिप्परकर, हरिबा जावीर, गोविंद लवटे, राजू कोळेकर सर, तसेच आरोग्य सेविका सविता रूपणर उपस्थित होते.
यानंतर मार्गदर्शनपर मनोगत माझी ग्रा प सदस्य भरत लवटे, जेष्ठ समाजसेविका मंगल लवटे, तसेच शुभांगी मॅडम यांनी व्यक्त केले. ग्रामीण भागातील नेत्र आरोग्य, जनजागृती आणि सामाजिक बांधिलकीवरील त्यांनी दिलेली मांडणी नागरिकांना उपयुक्त ठरली.तपासणीची संपूर्ण व्यवस्था शिस्तबद्धरीत्या पार पडली. सकाळपासून नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिसत होती. नेत्र तपासणी, सल्लामसलत आणि आवश्यक तेथे चष्मा वितरण अशा सर्व सेवा विनामूल्य देण्यात आल्या.

कार्यक्रमाच्या यशाचे श्रेय आयोजक, स्वयंसेवक, मान्यवर आणि ग्रामस्थांच्या सक्रिय व सकारात्मक सहभागाला जाते. बुद्धेहाळ ग्रामस्थांनी आरोग्याविषयी दाखविलेली जागरूकता ही सामाजिक प्रगतीचे सुंदर उदाहरण असल्याचे मान्यवरांनी सांगितले.
कार्यक्रमास उपस्थित जयसिंग लवटे अंकिता मॅडम, भारत कांबळे , गजानन लवटे , अर्जुन जावीर, यशवंत शेंडगे , विष्णू गडदे , संजय लवटे, विठ्ठल लवटे , तंटा मुक्तीचे अध्यक्ष बिरुदेव लवटे उपाध्यक्ष लक्ष्मण करांडे, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी पुजा लवटे तसेच बुद्धेहाळ , करांडेवाडी, बुद्धेहाळवाडी येथी आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थितीत होते































