
सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल,
शिक्षण विभागात खळबळ
सातारा :
नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून विविध व्यक्तींकडून तब्बल १ कोटी २ लाख रुपये उकळल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात विठ्ठल रामदासी (वय ६४, रा. रामदासी, सातारा) यांनी जिल्हा परिषद शिक्षण विभागातील प्रशासकीय अधिकारी सुनील रांजणे याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रामदासी यांच्या फिर्यादीनुसार, सन २०२४ ते २०२६ या कालावधीत सातारा येथील हॉटेल प्राईडच्या पार्किंग परिसरात रांजणे याने स्वतःची ओळख शासनाशी संबंधित अधिकारी असल्याची करून दिली. विविध शासकीय विभागात नोकरी लावून देतो, अशी खोटी आश्वासने देत त्याने अनेकांकडून वेळोवेळी मोठ्या रकमा स्वीकारल्या.
या फसवणुकीत खालील व्यक्तींकडून रक्कम घेतल्याचे निष्पन्न झाले आहे –
प्रशांत प्रकाश ओव्हाळ (रा. लासूर स्टेशन, औरंगाबाद) – ₹10 लाख, भगवान नागरगोजे (रा. नगर रोड, बीड) – ₹15 लाख, रमेश कानडे (रा. खोंडरस, जि. बीड) – ₹15 लाख, रविकुमार जोशी (रा. कण्हेरगाव, जि. हिंगोली) – ₹22 लाख, शिवाजी शिंदे (जि. हिंगोली) – ₹15 लाख, कमलाजी खंदारे (जि. हिंगोली) – ₹5 लाख अशा प्रकारे एकूण ₹1,02,00,000/- (एक कोटी दोन लाख रुपये) रकमेची फसवणूक केली असून कोणालाही नोकरी न देता रांजणे याने विश्वासघात करत फसवणूक केली असून तपास पोलीस उपनिरीक्षक गवळी हे करत आहेत.




















