राजेंद्रसिंह यादव यांच्या वाढदिवसानिमित्त प्रवीण पवार यांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले
महाराष्ट्र न्यूज कराड :
छत्रपती शिवाजी स्टेडियम परिसरातील अंगणवाडीत माननीय श्री राजेंद्रसिंह यादव यांच्या वाढदिवसानिमित्त एक भव्य शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन प्रवीण पवार (आप्पा) यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात माननीय श्री राजेंद्रसिंह यादव यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने करण्यात आली. त्यानंतर अंगणवाडीतील लहान मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. मुलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. यानंतर वाढदिवसानिमित्त केक कापून उपस्थित मान्यवर व नागरिकांच्या उपस्थितीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
या प्रसंगी वार्ड क्रमांक तीनमधील सर्व नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. यात श्री गोरख सूर्यवंशी, शिवराज इंगवले, अखिल आंबेकरी, गणेश गायकवाड, निशांत ढेकळे, तोसिफ शेख, रमजान कागदी, अधिकराव सूर्यवंशी, श्री मशाक शेख, अकबर शेख, ओमकार शिंदे, श्री मुळे, जब्बार शेख, राहुल सूर्यवंशी, सुरज सावंत, निलेश जाधव (बापू), अनिस भालदार, अविनाश गाडे, शरद काटे, चैतन्य पिसाळ, बरकत मुल्ला, शंकर सूर्यवंशी, रियाज मुल्ला, कबीर जमादार, महबूब शेख, मानतेश कोळी, अल्ताफ मुल्ला, सद्दाम शेख, जावेद शेख, बरकत मुल्ला, फिरोज शेख, अमीर हुसेन शेख, जलाल शेख, जमीर शेख, तालीब इराणी, शब्बीर शेख, इस्माईल मुल्ला, साबीर बागवान, आयाज शेख, वसीम शेख, लाला बागवान, इरफान मुल्ला, इरफान शेख, मुस्ताक शेख, सलीम शेख, मुन्ना शेख, टिपू शेख, अमीर कल्लूर, अश्रफ फकीर, जावेद सय्यद आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमात माननीय श्री प्रवीण पवार (आप्पा) यांनी माननीय श्री राजेंद्रसिंह यादव यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. अंगणवाडी सेविका श्रीमती. सुरेखा जाधव यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन माननीय श्री गुलाब शेख यांनी केले.
या उपक्रमामुळे अंगणवाडीतील लहान मुलांना शैक्षणिक साहित्याचा लाभ मिळून शिक्षणाबाबतची जागरूकता वाढली असून समाजातील सर्व घटकांच्या सहभागातून एक सामाजिक बांधिलकी जपली गेली.
कराड नगरीचे भवितव्य म्हणजे कराड नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव आहेत
सामान्य ते सामान्य नागरिकांसाठी अहोरात्र काम नेते आहेत : प्रवीण पवार ( आप्पा )




















