महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी सातारा* .
दि. 11 रोजी नक्षलसेल गोंदिया यांना काही विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली की पोलीस स्टेशन सालेकसा अंतर्गत बेस कॅम्प मुरकुट डोह हाद्दीतुन जाणाऱ्या रोडवर अपघात घडवून आणून पोलिसांच्या जाणाऱ्या रस्त्यामध्ये विघातक भूसुरुंग स्फोट घडवून पोलिसांच्या जिवास दगाफटका करण्याच्या उद्देशाने धनेगाव ते मुरकुट दोहोंच्या दरम्यान नक्षलवाद्यांनी रस्त्याच्या मधोमध पुरून ठेवलेल्या मुरकुट डोह च्या दरम्यान स्फोटके पुरून ठेवले ची माहिती गोपनीय सूत्राकडून मिळाली. त्या अनुषंगाने श्री मंगेश शिंदे पोलीस अधिक्षक गोंदिया यांच्या नेतृत्वाखाली सी- 60 सालेकसा येथील 2 कमांडो पथक, बी.डी.डी.ऐस पथक ,नक्षल ऑपरेशन सेल गोंदिया व पोलीस स्टेशन सालेकसा येथील अधिकारी व कर्मचारी यांनी संयुक्तरीत्या मोजे धनेगाव ते मुरकुटे डोह या रोडवर सर्च ऑपरेशन राबऊन मोजा दलदलकुही स्प्रिंग पॉइंट जवळ बी.डी.डी.ऐस. पथकाला काही संशयास्पद वस्तू असल्याचे जाणवल्याने खबरदारीच्या उपाययोजना करून पाहणी केल्यानंतर नक्षलवाद्यांनी घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने व पोलिसांना टार्गेट करून त्यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी आ.इ.डी पेरून ठेवलेले दिसून आले. लगेच बी.डी.डी.ऐस पथकाने याठिकाणी पुरून ठेवलेली स्फोटके निकामी करून बाहेर काढले. त्यामध्ये सिल्वर रंगाच्या ॲल्युमिनियम बेस, एक्स्प्लोझिव इलेक्ट्रिक डेटोनेटर, जर्मन डबा कंटेनर ,अंदाजे 5 ते 6 किलो स्पिलटर, इलेक्ट्रिक वायर, बॅटऱ्या असे स्फोटक साहित्य नक्षलवाद्यांनी घातपात करण्याच्या उद्देशाने लपवून ठेवल्याचे आढळले ते साहित्य जप्त करण्यात आले असून. पुढील कारवाई सुरू आहे. या ऑपरेशनमध्ये श्री मंगेश शिंदे (भा पो से) पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्या नेतृत्वात अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधिक्षक गोंदिया ,प्रशांत ढोले उपविभागीय पोलिस अधिकारी देवरी ,सपोनि प्रमोद बघेले नक्षल ऑपरेशन सेल , गोंदिया सपोनि राजकुमार डूणगे पोलीस स्टेशन सालेकसा, सपोनि संदीप चव्हाण बी.डी.डी.ऐस पथक ,गोंदिया तसेच सि- 60 कमांडो पथक सालेकसा, बीडीडीएस पथक गोंदियाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी केले असून कारवाई मध्ये सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पोलीस अधिक्षक गोंदिया यांनी अभिनंदन केले आहे.
सातारा मधील भूमिपुत्र असणाऱ्या अधिकार्याचे चौफेर कौतुक
या मोहिमेमध्ये काम करणाऱ्या पैकी बी.डी.डी.ऐस पथकात मुख्य भूमिका बजावणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण हे मूळचे आसनगाव ता.जि. सातारा येथील रहिवासी असून वडील ही पोलिस मध्येच सेवा बजवत होते. याआधीही मुंबई मधील 26-11 आतंकवादी हल्ल्या मधील कारवाईमध्ये ओबेरॉय हॉटेलमध्ये ब्लॅक कमांडो असणाऱ्या संदीप चव्हाण यांनी कारवायांमध्ये भाग घेतला होता. त्यामुळे आसनगाव वासिया व सातारा जिल्हा वाशीयांच्या कडून अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.






















