मुंबई –
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या पोलीस महासंचालक यांच्या विधी सल्लागार या पदाच्या स्पर्धात्मक परीक्षेत सूर्यकांत लवटे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवून गौरव मिळविला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहिरात क्रमांक 33/2024 द्वारे या पदाची जाहिरात एक वर्षांपूर्वी प्रसिद्ध केली होती. जाहिरातीच्या अटींनुसार दहा वर्षांपेक्षा अधिक वकिलीचा अनुभव असणाऱ्या शेकडो वकिलांनी या स्पर्धात्मक परीक्षेसाठी अर्ज दाखल केले होते.
दिनांक 5 जुलै 2025 रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली, तर 13 ऑक्टोबर 2025 रोजी मुलाखत प्रक्रिया पार पडली. या दोन्ही टप्प्यांचा एकत्रित निकाल आयोगाने 16 ऑक्टोबर 2025 रोजी आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला. त्यामध्ये सूर्यकांत लवटे यांनी महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
पोलीस महासंचालक यांच्या विधी सल्लागार या पदासाठी आयोगाकडून घेण्यात आलेली ही पहिलीच स्पर्धात्मक परीक्षा असून, सूर्यकांत लवटे हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत या पदावर नियुक्त होणारे पहिले विधी सल्लागार ठरणार आहेत.






















