महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी –
आपल्या वडिलांच्या विचारांचा वारसा जपत लोणंद नगरपंचायतचे प्रभाग क्रमांक ०१ चे कर्तव्यदक्ष नगरसेवक तथा पक्षप्रतोद हणमंतराव विनायकराव शेळके-पाटील हे सामाजिक क्षेत्रात नेहमीच लोकहिताय उपक्रम करत असतात.
०५ जून रोजी त्यांनी पत्नी सौ. वर्षा हणमंतराव शेळके-पाटील यांच्या सोबत वडाचे झाड लावून व तो योग्य रितीने सांभाळ करण्याची जोडीने शपथ घेऊन अनोख्या पद्धतीने लग्नाचा वाढदिवस साजरा केला. लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने तसेच वटपौर्णिमा व पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, विनायकराव शेळके-पाटील वस्ती, लोणंद येथे वडाच्या झाडाचे रोपण करुन ते जतन व सांभाळ करण्याची शपथ घेत पर्यावरणपुरक आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केल्याने लोणंद व पंचक्रोशीतुन या उपक्रमाचे कौतुक होत आहे.