महाराष्ट्र न्यूज फलटण प्रतिनिधी : गणेश पवार
दिल्ली येथे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशीयारी यांची भेट घेतली व महाराष्ट्रातील सद्यस्थितीवर अनेक विषयावर चर्चा केली यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील पेटलेला मराठा आरक्षणाचा विषय यावर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही परखड भूमिका मांडली आज मराठा समाजातील मुलांचे शैक्षणिक खूप मोठे नुकसान होत आहे नोकऱ्यांचा प्रश्न जटिल बनत चालला आहे .मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे समाजातील युवक नोकरी व शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या आड कोणी येऊ नये .
मराठा आरक्षणाच्या विरोधात प्रति मोर्चे काढणाऱ्यांनी मराठा समाज हा इतर समाजाचा आरक्षण वगळून आरक्षण मागत नाही . याउलट समाजातील सर्व नेतेमंडळींनी आरक्षणाला पाठिंबा दिला पाहिजे तरी या बाबत राज्यपाल महोदयांनी लक्ष घालावे अशी मागणी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी केली तसेच महाराष्ट्रामध्ये महा विकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना लाईट बिल याच्या बाबत दिलेला शब्द पाळावा लोकांना भरमसाठ लाईट बिल आलेली आहेत.
लॉकडाऊन मुळे लोकांची आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची असताना लोकांना लाईट बिल भरणे सुद्धा शक्य नाही .तरी या बाबत राज्य शासनाला आपण सूचना देऊन सरसकट लाईट बिल माफी द्यावी अशीही मागणी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केली. यावेळी राज्यपाल महोदयांनी वरील दोन्ही विषयांमध्ये लक्ष घातले जाईल असे आश्वासन यावेळी दिले आहे.




















