सातारा : राज्यातील चारी कृषी विद्यापीठा अंतर्गत येणारे सर्व कृषी क्षेत्रातील विद्यार्थी सातव्या सत्रात प्रत्येक्ष शेतात जाऊन शेतकऱ्यांना विविध प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करत असतात ग्रामीण कृषी जागृती कार्यानुभव व कृषी अवद्योगिक जोड (रावे) कार्यक्रमांतर्गत महाविद्यालय परिसरातील गावांमध्ये कृषीदूत व कृषी कन्या एकत्रित गट करून संहा महिने हा उपक्रम राबवत असतात मात्र यावेळी कोरोनामुळे विध्यार्थ्यांना स्वतःच्या गावात हा उपक्रम राबवण्याची संधी मिळाली आहे महात्मा कृषी विद्यापीठ राहुरी सलनग्न भारती विद्यापीठ अंतर्गत लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालय कडेगाव ता कडेगाव जि सांगली येथील चतुर्थ वर्षातील विद्यार्थी कु अजय शंकर जाधव हा सदर उपक्रम आपल्या गावातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन राबवत आहेत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राहुरी कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार व शिक्षकांचा मार्गदर्शनाखाली जळगांव येथे ऑनलाइन पद्धतीने राबवत आहे सध्याच्या या कोरोनाच्या स्थितीमध्ये हा कृषी कार्यक्रम योग्य पद्धतीने राबवण्याचा सूचना संस्थेने दिल्या आहेत तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली उपरोक्त कृषी कार्यानुभ कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला जात आहे विद्यार्थी मार्गदर्शक व कॉलेज समन्वयक विषय तज्ञ म्हणून प्रा, शिंदे सर काम काम पाहत आहेत सोबत सौरभ कदम, श्वेता जाधव, प्रमोद जाधव यांचे विशेष सहकार्य लाभत आहे