महाराष्ट्र न्यूज वडगांव निंबाळकर प्रतिनिधी संतोष भोसले
आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांचा 194 वा राज्याभिषेक सोहळा बुधवारी( दि.22) वडगाव निंबाळकर येथे साजरा करण्यात आला. यावेळी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे याच्या हस्ते आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. याप्रसंगी जय मल्हार क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब मदने, ज्ञानेश्वर सानप, अमोल गायकवाड, किरण लकडे, निलेश मदने, आकाश वाघमारे, हनुमंत भंडलकर, बबन भंडलकर, लालासो खोमणे आदी उपस्थित होते.यावेळी नानासाहेब मदने यांनी कोरोनाचे मोठे संकट देशात व राज्यात मोठ्या प्रमाणात असल्याने राज्याभिषेक सोहळा साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले. आवाहनाला प्रतिसाद देत कोरोनाचा वाढता प्रादुरभाव लक्षात घेता सोशल डिस्टनिंगचे तंतोतंत राज्यभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला होता.
आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांना त्याकाळी राजे म्हणून संबोधण्यात आले, तसे समकालीन पत्र व पुरावे उपलब्ध आहेत. पण आज जो राज्याभिषेक तारीख जी सांगितली जात आहे ती 22 जुलै 1826 या तारखेच्या निमित्ताने इतिहासात जर पुरावे तपासले तर असे माहिती होतं कि दि.16 जुलै 1826 रोजी फलटणचे संस्थानिक उर्फ जहागिरदार यांना दौंड ते जेजुरी या दरम्यान गाठण्यात आले. या दरम्यान उमाजी नाईकांनी सुमारे 8000 रू.ची मालमत्ता मिळवली. यावेळी ब्रिटिश सरकारतर्फे सासवड येथे जोवाहरसिंग हा पोलीस प्रमुख/जमादार होता. 16 जुलै 1826 या घटनेनंतर जोवाहरसिंग व त्याचा मुलगा रामसिंग या घटनेनंतर उमाजी नाईक यांच्या कसून मागावर होते.. जोवाहरसिंगतर्फे हा शोध व प्रयत्न जोरदार असल्याचे दिसते कारण लगेचच 26 जुलै 1826 ला उमाजी राजे आणि या दोघांची जोवाहरसिंग याच्या प्रत्यक्ष घरी जोरदार चकमक झाली व त्याचा मुलगा ओलिस म्हणून उमाजी राजांनी पुरंदर येथे आणला. महणजे उपलब्ध पुराव्या नुसार 16 जुलै ते 26 जुलै या दिवसात स्वता उमाजी राजे धावपळ करीत होते. तर याच काळात थोडे पुढेमागे एक व्यक्ती पुण्यात कलेक्टर राॅबर्टसनला भेटली व उमाजी राजे यांना पकडून देण्यात सरकारला मदत करण्यात इच्छुक असल्याचे सांगितले. सांगायचा मुद्दा असा की या प्रकारे उमाजीराजांना पावलोपावली धोका उत्पन्न होता. ब्रिटिश सरकार त्यांना पकडण्यासाठी टपून बसले होते. अश्या सगळ्या धोकादायक वातावरणात 22 जुलै 1826 रोजी उमाजी राजे यांचा कडेपठार जेजूरी येथे राज्याभिषेक करण्यात आला.