महावितरणच्या कारभाराला म्हसवडकर कंटाळले कधी देणार प्रशासन लक्ष ?
लक्ष न दिल्यास ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
म्हसवड सिद्धनाथ मंदिर परिसर गुरव गल्ली येथील डीपी मधील मेन अंडरग्राउंड वायर गल्लीला सप्लाय करते .एक वर्षापूर्वी नगरपालिकेच्या वतीने गटर बांधकामाचे काम चालू होते.त्यावेळेस गटारीचे खुदाई करत असताना ती वायर तुटून पडली असल्यामुळे तेव्हापासून जॉईंट करून लाईट चालू होती. गेल्या दोन तीन महिन्यांमध्ये त्या ठिकाणी शोक सर्किट झालेले होते. ते महावितरणला सांगून सुद्धा महावितरणने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आहे.

खूप मोठा अनर्थ टळला कारण त्या ठिकाणातून भाविक भक्त जन लहान मुले हे ये-जा करत असतात. हे सायंकाळी सातच्या सुमारास घडल्यामुळे या ठिकाणी गर्दी नव्हती. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता तरी महावितरणने याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे आणि नागरिकांना जो त्रास होत आहे. तो दूर करावा अन्यथा नागरिकांनी आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे. गेले पंधरा ते वीस तास झाल्यावर हे नागरिक बिगर लाईट अंधारामध्ये आहेत.तर लवकर याच्याकडे लक्ष देऊन हे काम पूर्ण करून घ्यावे अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे.
म्हसवड येथे मुख्य वाहक तार शॉर्टसर्किट (छायाचित्र आकाश दडस )






















