मा. मुख्यमंत्री व कराड दक्षिण चे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते विंग येथे संरक्षक भिंत व रस्त्याच्या 4 कोटी 3 लाखांच्या कामांचे भूमिपूजन.
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : विंग गावाला लागून जो राज्यमार्ग क्रमांक 148 जातो तो एका ओढ्या शेजारून जातो. त्या ओढ्याला पावसाळ्यात भरपूर पाणी असते. गावातील बरीचशी घरे ओढ्याला लागूनच आहेत.शिवाय लागून रस्ताही आहे. त्यामुळे ओढ्याला संरक्षक भिंत बांधावी हा गावकऱ्यांकडून प्रस्ताव होता. यामुळे एक कोटी साठ लाख रकमेची भिंत या ठिकाणी मंजूर करण्यात आली व त्याचा शुभारंभ ही झाला.21 मीटर लांबीची ही संरक्षक भिंत आहे. रस्त्याचे काम या मध्ये अंतर्भूत आहे असा हा पहिला टप्पा असून यासह सुमारे चार कोटी तीन लाखाची कामे या भूमिपूजन मध्ये आहेत. त्यामुळे गावाच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असलेल्या पृथ्वीराज बाबांनी विंग या या गावाला झुकतं माप दिलं. या भूमिपूजन व उद्घाटन प्रसंगी एड.उदयसिंह पाटील उंडाळकर, शंकरराव खबाले:जिल्हा परिषद सदस्य सातारा,इंद्रजीत चव्हाण, मनोहर शिंदे उपनगराध्यक्ष मलकापूर, सौ. खबाले;सरपंच, सौ. अलका पवार; सदस्य, विठ्ठल राऊत; सदस्य, बाबुराव खबाले; सदस्य,संतोष पाटील;सदस्य,व शंकर ढोणे सदस्य ग्रामपंचायत विंग यांच्यासह समस्त ग्रामस्थ या भूमिपूजन उद्घाटनप्रसंगी उपस्थित होते.