महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :
मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ५ लाख ६१० पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत. ६ लाख २६ हजार व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे.अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते २१ जून या कालावधीत कलम १८८ नुसार १ लाख ३३ हजार ७३० गुन्हे नोंद झाले असून २७ हजार ४४६ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ८ कोटी ४१ लाख ३२ हजार ४६१ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – २७५ (८५४ व्यक्ती ताब्यात)
१०० नंबरवर आलेले फोन – १ लाख ०४ हजार ०४०
राज्यात एकूण क्वारंटाईन केलेल्या व्यक्ती – ६ लाख २६ हजार ३५३
अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३३५
जप्त केलेली वाहने – ८३ हजार ९७०
परदेशी नागरिकांवर व्हिसा उल्लंघनाचे नोंदवलेले गुन्हे – १५
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मृत्युमुखी पडलेले पोलीस – ४८
(मुंबईतील ३१ पोलीस व १ अधिकारी असे एकूण ३२, पुणे ३, सोलापूर शहर २, नाशिक ग्रामीण ३, एटीएस १, मुंबई रेल्वे २, ठाणे ग्रामीण २, जळगाव ग्रामीण१,पालघर १)
कोरोना बाधित पोलीस – ११६ पोलीस अधिकारी व ९०० पोलीस कर्मचारी
राज्यातील एकूण रिलिफ कँप -९८ (सुमारे ३ हजार २६६ लोकांची व्यवस्था)