विसावा नाक्यावरील रस्त्याने घेतला मोकळा श्वास : जिल्हा परिषद चौक ते बाँम्बे रेस्टॉरंट चौका दरम्यानच्या रस्त्यावरील फळ आणि किरकोळ विक्रेते यांची अतिक्रमणे आज सातारा नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभाग आणि सातारा वाहतूक पोलीस विभागातर्फे काढण्यात आल्यामुळे या रस्त्याने मोकळा श्वास घेतला
असून सदरची कारवाई हा केवळ फार्स ठरू नये एवढीच माफक अपेक्षा या परिसरात राहणाऱ्या अबालवृद्धांसह नागरिकांनीं केली आहे.