कराड : मौजे मुसांडवाडी, ता.खटाव येथे राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर झालेल्या विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा राज्याचे सहकार कथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते आज संपन्न झाला
यामध्ये मोरेमळा येथे अंगणवाडी इमारत बांधणे या कामाचे भूमिपूजन व जगतापवाडी – मोरेमळा – मुसांडवाडी रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.
याप्रसंगी सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, इंदिराताई घार्गे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा भाग्यश्री भाग्यवंत, माजी सदस्य जितेंद्र पवार, खटाव मार्केट कमिटीचे माजी सभापती सी. एम. पाटील, खटाव पंचायत समितीचे माजी सभापती संदीप मांडवे, संतोष घार्गे, पांडुरंग चव्हाण, भाऊसाहेब लादे, साहेबराव शिंदे, मोहम्मद आवटे, नंदकुमार डोईफोडे, साधूनाना मगर, विलास शिंदे, नंदकुमार सोलापुरे, ज्ञानेश्वर पाटील, बबन माळी, अविनाश शिंदे, अनुसया जगताप, फडणीस गुरुजी, दाऊद पटेल, आनंद जगताप, पोपट जगताप, पांडुरंग जगताप, प्रकाश मोरे, मच्छिंद्र मोरे, देविदास जगताप, रामदास कदम, इस्माईल पटेल, जिजाबा जगताप, अशोक जगताप, बाळु पटेल, हरून पटेल, पीडब्ल्यूडी उपअभियंता देसाई, जिल्हा परिषदेचे उपअभियंता खाडे, कुलकर्णी तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते.