शालेय शिक्षण व क्रिडा विभागांतर्गत दिल्या जाणाऱ्या क्रीडा साहित्यामध्ये ग्रामपंचायत अंगापुर तर्फ तारगाव कुस्ती मॅट चे लोकार्पण आमदार शशिकांत शिंदे यांच्या शुभ हस्ते पार पडले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार शिंदे यांनी सांगितले की, कोणत्याही कामासाठी मी कमी पडणार नाही.
आज पर्यंत अंगापूर वंदन व अंगापुर तर्फ तारगाव या गावातून राज्यात कुस्ती क्षेत्रांमध्ये मोठे नावलौकिक मिळवलेले आहे.इथून पुढेही त्यांना लागणाऱ्या सर्व गोष्टींची पूर्तता देण्यासाठी मी बांधील राहीन अशी ग्वाही आमदारांनी बोलताना दिली.
या कार्यक्रमासाठी अंगापुर तर्फ तारगाव ग्रामस्थ अंगापूर वंदन ग्रामस्थ उपस्थित होते.