लोणंद प्रतिनिधी : शेअर बाजारात पैसे दुप्पट करून देतो म्हणुन तब्बल साडेसात लाखांची फसवणूक प्रकरणी एकास अटक; फलटण ग्रामीण पोलिसांची कामगीरी. लोकांचा विश्वास संपादन करुन, शेयर मार्केट मध्ये गुंतवणूक करुन दुपटीने नफा मीळउन देतो असे म्हणत लोकांकडून पैसे घेणाऱ्या भामट्यास फलटण ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी विक्रम जगन्नाथ भोसले, ,राहणार साखरवाडी यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी पांडुरंग दत्तात्रय चव्हाण, वय 41, रहाणार साखरवाडी याच्याविरोधात २३ जून रोजी गुन्हा नोंदवला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी लगेच तपास सुरू केला असता आरोपीच्या खात्यामध्ये फिर्यदिने सात लाख सहासष्ट हजार पाचशे रुपये रक्कम पाठवल्याचे लक्षात आले. तसेच आरोपीने गावातील आणखी दोघांना आणि दोन ऊसतोडणी कामगारांनाही गंडा घातल्याचे निदर्शनास आले.त्यावरून आरोपीला भा. द. वि. कलम ४२०,४१८,४०६ या कलामांतर्गत रात्री साडे आठ च्या सुमारास अटक करण्यात आली आहे ,परंतु आरोपीकडून अद्याप कोणत्याही प्रकारचा मुद्देमाल मिळाला नाही. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक गोडसे साहेब, पोलीस उपनिरीक्षक धोंगडे मॅडम करत आहेत.सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहता आणि दररोज घडणाऱ्या फसवणुकीच्या घटना लक्षात घेता लोकांनी शेअर बाजाराचे संपूर्ण ज्ञान संपादन करुन, तसेच आपली संपत्ती आणि गोपनीयता जपणाऱ्या विश्वासू माध्यमांतून गुंतवणूक करावी असे आवाहन पोलीस निरीक्षक गोडसे साहेब आणि धोंगडे मॅडम यांनी महाराष्ट्र न्यूज च्या माध्यमातून लोकांना केले आहे.
| ReplyForward |






















