महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी :म्हसवड
सातारा जिल्ह्यातील माणदेशी तरुणासाठी पहिल्या नाविन्यपूर्ण ग्रंथालयाचे भूमिपूजन म्हसवड येथील मेगा सिटी मध्ये माणदेशी फौंडेशन संस्थेच्या संस्थापिका चेतना सिन्हा यांचे प्रमुख उपस्थित व २०१९ च्या एमपीएससी मधील बेस्ट स्टूडंट विजय पिसे यांच्या वयोवृध मातोश्री श्रीमती विमल पिसे यांच्या हस्ते करण्यात आले .
याचा मला सार्थ अभिमान आहे असे यावेळी बोलताना चॅम्पियनचे अध्यक्ष प्रभात सिन्हा म्हणाले. यावेळी या कार्यक्रमास अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा, विमल पिसे, बीएसएनएलचे सुनील कुलकर्णी, माजी नगरा ध्यक्ष विजय सिन्हा व उपाध्यक्ष जवाहर देशमाने आदि मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी करोनाच्या पार्शभूमीत सोशल डीस्टनसंच भान ठेवूनच छोठेखाणी मध्ये कार्यक्रम पार पाडला. पुढे बोलताना प्रभात सिन्हा म्हणाले कि, या ग्रंथालयाच्या जडणघडण मध्ये माझे बंधू करण सिन्हा यांचा सिंहाचा वाट आहे. करण सिन्हा हे उच्च क्षिक्षणा निमित्ताने अमेरिकेत असूनही आपल्या भागातील आपल्या मातीतल्या सवंगड्या साठी जे करता येईल तो प्रयत्न त्यांचा सतत चालू असतो.
खर तर या ग्राथालायाची संकल्पना हि मूळ चेतना सिन्हा यांची परंतू खा. हुसेन दलवाई यांच्या मदतीतून हे कार्य पूर्णत्वास जात आहे शिवय याचा ख-या अर्थाने पाठपुरावा करण सिन्हा यांनी केला असं म्हटलं तर वावग होणार नाही. यावेळी बोलताना श्रीमती चेतना सिन्हा म्हणल्या खासदार श्री. हुसेन दलवाई यांच्या मदतीतून व श्री करण सिन्हा यांच्या कल्पनेतून म्हसवड मध्ये विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक सुसज्य ग्रंथालय लवकरच सुरु करण्यात येत आहे.
या ग्रंथालयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात पुढे जाण्यास मोलाची मदत होणार आहे. ग्रंथालयामुळे वाचनीय साहित्य मिळते व वाचनाने नाविन्यपूर्ण युवा पिढी घडते. आजकालच्या तरुणा मध्ये मोबाईल एवजी ग्रंथाची गोडी निर्माण झाल्यास हाच तरूण उद्याचे भविष्य घडवणार आहे आणि म्हणूनच माणदेशी संस्थेचा छोटासा प्रयत्न. (चौकट)युवकांसाठी नाविन्यपूर्ण ग्रंथालयाचे भूमिपूजन आज होत असून या ग्राथालायासाठी गेले दोन वर्ष सतत पाठ पुरावा केला व आज या आधुनिक ग्रंथालयाच भूमिपूजन करण्यात येत आहे. शिवाय कालच छत्रपती शाहू महाराजांची जयंती व ह्या ग्रंथालयाची स्थापना हा एक योगा योगच म्हणावा लागेल.
माझं सतत नवीन काहीतरी करण्याची धडपड असते, हे ग्रंथालय तर फक्त सुरावात आहे. माझ्या माणदेशी मातीला जेवढं देईन तेवढं कमीच…….! ह्या माती ने हजारो रत्न दिले आहेत आणि माझं काम आहे की मी ह्या माण देशाला परत देणं…….! असे हजारो रत्न ह्या ग्रंथालयातून घडो ही आशा व आपेक्षा………!श्री. करण सिन्हा (जॉर्ज वॉशिंग्टन युनिवर्सिटी, अमेरिका)
या ग्रंथालय भूमिपूजनाच्या निमित्ताने शुक्रवार दिनांक २६ जून रोजी करण सिन्हा यांनी आपल्या सर्व भारतीय बांधवाना फेसबुक च्या माध्यमातून आव्हान केले कि, ज्यांनी देशात शिक्षणाचा पाया रचला, लाखो विद्यार्थांना देशात आणि जगभरात शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले, ज्यांनी जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन एक नवीन विचार दिला असे ते म्हणजे “छत्रपती राजर्षी शाहू महाराज”! आज त्यांची जयंती, त्यांच्या जयंती निमित्त आम्ही उद्या शनिवार दि. २७ जून रोजी भूमिपूजन करणार आहे.
मी जरी अमेरिकेत आसलो तरी माझे सर्व कामांवर लक्ष असत. ज्या गोष्टीसाठी मी दोन वर्ष प्रयत्न केले ती आज पूर्ण होत आहे. आजचा दिवस हा माझ्यासाठीच न्हवे तर ह्या देशासाठी महत्त्वाचा आहे. अखेर प्रतीक्षा संपली आहे, उद्या सातारा जिल्ह्यातील पहिल्या नाविन्यपूर्ण वाचनालयासाठी पहिला दगड लावला जाईल. या भूमीने मला सर्व काही दिले आहे आता ते परत देण्याची वेळ आली आहे. ही फक्त एक सुरुवात आहे.हा भूमी पूजनाचा कार्यक्रम यशस्वी होण्यास सारंग नवाळे, श्रीकांत पतंगे, अक्षय पोळ व करण सिन्हा मित्र परिवार यांनी विशेष परिश्रम घेतले.






















