महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी (इंदापूर): शहाजीराजे भोसले
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मंत्रालय मुंबई चे महासंचालक तथा सचिव डॉ. दिलिप पांढरपट्टे यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका व शहर ग्रामीण मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका या दोन्हीही पत्रकार संघाने कोविड – १९ च्या पार्श्वभूमीवर तेरा हजार उपेक्षित कुटुंबांंना जीवनावश्यक वस्तुंचे मोफत वाटप करुन माणुसकीचे दर्शन घडीवले आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती करीत सामाजिक वसा जोपासला आहे . असा गौरव करीत उपक्रमाबाबत अभिनंदन करत पत्रकार संघाच्या कार्याची दखल शासनस्तरावर घेतली आहे .
यासंदर्भात अधिक माहिती अशी की , महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका व शहर – ग्रामीण मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते , मुख्य सचिव सागर शिंदे , तसेच पत्रकार संघाचे जेष्ठ मार्गदर्शक मधुकर गलांडे , यांना महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क मंत्रालय मुंबई महासंचालनालयाच्या वतीने ( दि.१० सप्टेंबर २०२० ) रोजी शासनाच्या वतीने , दोन्हीही पत्रकार संघाच्या माध्यमातून राबिवण्यात आलेल्या उपक्रमाबाबत गौरव व अभिनंदन केले आहे .
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देश आणि महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर झाले . अचानक आलेल्या संकटात अनेक व्यवसायांना अडचणीचा सामना करावा लागला शासनाने अनेक उपाययोजना करून नागरिकांना धीर देत मदत जाहीर केली . सामाजिक संस्थांनी सहकार्य करावे असे शासनाने आव्हान केले या आव्हानाला प्रतिसाद देत , महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे व प्रदेशाध्यक्ष वसंत मुंढे , तसेच राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका व शहर ग्रामीण मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका या पत्रकार संघांंनी इंदापूर तालुक्यातील २२ दुष्काळी गावातील गरीब उपेक्षित गरजू , शेतमजूर , कलाकार , कलावंत , मच्छिमार अशा कुटुंबांना सामाजिक दृष्टीने मदत केलेली आहे .
सध्या जग आणि देशाला महामारीने ग्रासले असताना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेच्या माध्यमातून वास्तव मांडत हजारो उपेक्षितांना जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप करून माणुसकीचे आदर्श दर्शन घडवले आहे . तर पत्रकारितेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती करत सामाजिक वारसा जोपासला आहे . असा गौरव शासनाच्या वतीने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी केलेला आहे.
” मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कार्यालयास प्रस्ताव दाखल “
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच सार्वजनिक बांधकाम पशुसंवर्धन दुग्धविकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या तसेच शहर ग्रामीण मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका या पत्रकार संघाच्या कार्याची दखल घेत , राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचेकडे शासनाच्या माध्यमातून पत्रकार संघाला गौरवण्यांत यावे यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे शासनाकडे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत . राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विषेश अभिनंदन पत्रकार संघाचे केले आहे .
” राज्य संघटक संजय भोकरे यांचे कडून विशेष अभिनंदन “
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे व प्रदेशाध्यक्ष वसंत मुंढे तसेच राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते , मुख्य सचिव सागर शिंदे , जेष्ठ मार्गदर्शक मधुकर गलांडे , तालुका उपाध्यक्ष संदिप सुतार , जिल्हा संपर्क प्रमुख महेश स्वामी , जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सोमनाथ ढोले व सर्व कार्यकारणी सदस्य यांचे विशेष अभिनंदन केले आहे .