फलटण प्रतिनिधी फलटणचे नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालयातील इतिहास विभागामार्फत ०६ जून २०२२ रोजी शिवराज्याभिषेक दिन उत्साहात संपन्न झाला. सर्वप्रथम महाविद्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौक फलटण येथे महाविद्यालयाच्या वतीने प्रभात फेरी काढून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. दिपक राऊत पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मंथन या विषयावर प्रा. बी.बी.सोनवलकर (प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल व ज्युनियर कॉलेज फलटण) यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यांच्या व्याख्यानांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू प्रसंगानुरूप सांगितले व त्या गुणांचा आपल्या जीवनामध्ये कसा उपयोग करावयाचा याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर महाविद्यालयाचे प्र प्राचार्य डॉ.दिपक राऊत पवार यांनी या कार्यक्रमातून आपण काय शिकावे व काय अनुकरण करावे.कुठलाही कार्यक्रम नाचून न साजरा करता तो वाचून आपल्या व्यक्तिमत्वात त्याचे अनुकरण कसे होईल व तसे आदर्श येणाऱ्या पिढीला देता येतील या पद्धतीने साजरे करावे असे आवाहन केले.

महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. नेहा रुपेश शिंदे हिने महाराजांच्या कार्यकर्तृत्व या विषयी प्रेरणात्मक अशी सुंदर कविता सादर केली. या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी व प्राध्यापक प्राध्यापिका उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी विद्यार्थिनीनी पारंपरिक अशा वेशभूषा साजरा केल्या होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दयानंद बोडके सर प्रास्ताविक प्रा. आनंद गायकवाड सर तर आभार सौ. गाढवे मॅडम यांनी मानले.




















