महाराष्ट्र न्यूज इंदापूर तालुका प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले :
शहाजीनगर ( ता.इंदापूर ) येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्यावरती आज शनिवारी ( दि.२२ ) रोजी सकाळी श्री गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील यांच्या हस्ते उत्साहात व सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून करण्यात आली . यावेळी विधिवत पूजेचे पौराहित्य कैलास गुरव यांनी केले . या प्रतिष्ठापना कार्यक्रम प्रसंगी अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते . राज्याचे माजी मंत्री व कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांनी कारखान्याच्या कार्यस्थळावर अतिशय सुबक व देखणे असे श्रीगणेशाचे मंदिर उभारले आहे. या मंदिरामध्ये गणेशोत्सवानिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे सभामंडपात श्री गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आज आनंदी वातावरणात करण्यात आली . यावेळी कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील यांनी श्री गणेशाने जनतेची कोरोनाच्या संकटातून सुखरूप सुटका करावी , असे साकडे घातले ._______________________________