सुगावा-इंदापूर :- प्रतिनिधी मयुर देवकर
इंदापुर तालुक्यातील शहा गावात मा.विष्णू (आबा)पाटील व मित्र परिवार यांच्या संयुक्त आयोजनाने रक्तदान शिबिर आयोजित केले होते .सदर रक्तदान शिबिरात 150 रक्त पिशविचे उद्दिष्ट ठेवले असुन शहा गावात चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळत असुन ते नक्कीच पुर्ण होईल असा विश्वास मा. विष्णू ( आबा) पाटील यांनी व्यक्त केला. शहा गावचे सरपंच मा.धनाजी देवाकते म्हणाले की इंदापुर तालुक्याचे लोकप्रिय आमदार तथा राज्य मंत्री मा ना दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या सुचनेनुसार व मा आरोग्य मंत्री राजेश टोपे व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या अवाहनाला ग्रामीण भागातील जनते कडून चांगला प्रतिसाद लाभत असुन जे आवश्यक आहे ते सर्व ग्रामपंचायत च्या माध्यमातून केले जाईल असे अश्वशित केले.सदर कार्यक्रमाला अशोक पाटील, धनाजी ईजगुडे, रामदास पाटील, महादेव लांडगे,दादा भोई,संतोष निकम,दत्तात्रय पाटील सह शहा ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.