माणदेशी फाउंडेशन व बेल एअर हॉस्पिटल यांच्यावतीने सातारा जिल्ह्यातील पंचवीस हजार महिलांना मोफत लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे, आत्तापर्यंत म्हसवड 6183, गोंदवले 2824, वडूज 3484, लोणंद2523 येथे कोरोना लसीचा पहिला डोस पूर्ण झाला असून आता सातारा शहर व तालुका येथील 6000 पेक्षा जास्त महिलांचे लसीकरण चे नियोजन करण्यासाठी माणदेशी च्या संस्थापिका श्रीमती चेतना सिन्हा यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती.सातारा तालुक्यातील महिलांनी लसीकरण करण्यासाठी पहिल्यांदा नाव नोंदणी म्हणजेच रजिस्ट्रेशन करणे गरजेचे असून मान देशी महिला बँक सातारा येथील कार्यालयात दिनांक 17 ऑगस्ट 20 ऑगस्ट दरम्यान नाव नोंदणी करण्याचे आव्हान त्यांनी केले तसेच नाव नोंदणी झाल्यानंतर सातारा येथील स्वराज्य संस्कृतीक भवन कोरेगाव रोड या ठिकाणी 24 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या कालावधीत नोंदणी असणाऱ्या सर्व महिलांना मोफत लसीकरण होणार आहे अशी माहिती श्रीमती चेतना सिन्हा यांनी दिली या वेळी माणदेशी च्या रेखा कुलकर्णी, वनिता शिंदे, विजय सिन्हा, अर्पणा सावंत, ज्योती जाधव, रेश्मा काटकर, मंगेश जाधव, मनोज पवार, इत्यादी उपस्थित होते.