दौलतनगर दि.०१:- राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी कोरोना संसर्गापासून आपला बचाव करण्यासाठी “माझे कुटूंब माझी जबाबदारी” ही संकल्पना राज्यातील जनतेच्या समोर ठेवली आहे. संपुर्ण राज्यामध्ये ही संकल्पना लोकचळवळ बनली आहे.राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी “माझे कुटूंब माझी जबाबदारी” या संकल्पनेची ग्रामीण भागात जनजागृती करण्याकरीता पाटण मतदार संघातील गावागांवात जाणार असल्याचे जाहीर केले होते त्यानुसार ते शनिवार दि.०३ व रविवार दि.०४ ऑक्टोंबर या दोन्ही दिवशी मतदारसंघातील मणदुरे व चाफळ विभागातील प्रमुख गांवागांवात गावभेटी करीता जाणार आहेत व कोरोनाच्या महामारीत “माझे कुटूंब माझी जबाबदारी” या मोहिमेचे महत्व पटवून देणार आहेत.
राज्य शासनाने राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु केलेल्या ‘माझे कुटुंब,माझी जबाबदारी’ या अभियानाला संपुर्ण राज्यभर प्रभावीपणे सुरुवात झाली आहे.पाटण विधानसभा मतदारसंघात गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे हस्ते या योजनेचा शुभारंभ झाला त्या शुभारंभादिवशी त्यांनी स्वत: गावागावात जावून या मोहिमेचे महत्व कोरोनाच्या महामारीत काय आहे? हे ग्रामीण भागातील नागरिकांना व महिलांना पटवून दिले होते व यापुढेही मतदारसंघातील प्रमुख गांवामध्ये याची जनजागृती करणार असे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार ते शनिवार दि.०३ रोजी मणदुरे व रविवार दि.०४ रोजी चाफळ असे सलग दोन दिवस या दोन्ही विभागातील प्रमुख गांवागांवात गावभेटीकरीता जाणार असून या प्रमुख गांवामध्ये जावुन स्पीकरवरुन ते ‘माझे कुटुंब,माझी जबाबदारी’ या अभियानांची ग्रामस्थ, महिला व युवक-युवतीमध्ये जनजागृती करणार आहेत.
या उपक्रमाबद्दल बोलताना ना.शंभूराज देसाई म्हणाले,कोरोना संसर्गापासून आपला बचाव करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी “माझे कुटूंब माझी जबाबदारी” ही संकल्पना राज्यातील जनतेच्या समोर ठेवली.आम्ही सर्व लोकप्रतिनिधी तसेच तालुकास्तरावरचे सर्व शासकीय अधिकारी,कर्मचारी गावागावामध्ये या संकल्पनेच्या माध्यमातून जागृती करण्याचा प्रयत्न करत आहेत. पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये मी स्वत: प्रमुख गावांमध्ये येवून या मोहिमेतंर्गत लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे, विशेषत: सतत मास्क वापरला पाहिजे, बाहेरुन घरात आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुतले पाहिजेत,बाहेर जात असताना सामाजिक अंतर पाळले पाहिजे, या ज्या महत्वाच्या बाबी आहेत.त्याचे गावां गावामध्ये जावून लोकांना मी आवाहन करणार आहे.त्यानुसार गावभेटीचे नियोजनही केले आहे.
मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते,पदाधिकारी या सर्वांना माझी विनंती आहे. गावागावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य असतील,विविध संस्थाचे,राजकीय पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते असतील यांनी सगळ्यांनी आपआपल्या गावामध्ये,वाडीवस्तीमध्ये,आपल्या वार्डामधील नागरिक,महिला,युवक-युवती यांच्यामध्ये सामाजिक अंतर ठेवून जनजागृती करावी.लोकांना सर्वसामान्य माणसांना,वयोवृध्दांना, तरुण तरुणींना याचे महत्व पटवून द्यावे आणि “माझे कुटूंब माझी जबाबदारी” या मोहिमेतंर्गत आपण कशी काळजी घेतली पाहिजे,काय खबरदारी घेतली पाहिजे हे सगळ्यांनी आपआपल्या विभागामध्ये,गावामध्ये याचा प्रसार करावा.
नागरिकांना हे समजून सांगितले पाहिजे, शेवठी ही जबाबदारी आपली स्वत:ची आहे,शासन कोरोनाच्या संदर्भात आवश्यक त्या उपाययोजना करायला कुठेही कमी पडत नाही,आपण पाहिले कोरोनाच्या संदर्भात हा संसर्ग रोखण्याकरीता ज्या ज्या उपाययोजना संपुर्ण राज्यामध्ये करायला लागल्या त्या सर्व उपाययोजना शासनाने केल्या आहेत.याच्यासाठी कधीही निधीची कमतरता पडू देणार नाही असे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी जाहीरपणे सांगितले आहे.यापुढे सुध्दा ज्या-ज्या बाबी हा संसर्ग रोखण्याकरीता कराव्या लागतील त्या करण्यासाठी सरकार सदैव कठीबध्द आहे.असेही मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले आहे.पण या रोगापर्यंत आपण जाणारच नाही ही जर खबरदारी आपण अगोदरच घेतली तर निश्चीतपणे याच्यापासून आपला बचाव होईल,आणि म्हणून पाटण विधानसभा मतदार संघातील सर्व कार्यकर्त्यांना,बंधू भगिंनींना माझी विनंती आहे या मोहिमेमध्ये आपण सर्वजण सहभागी व्हा. या सर्व खबरदाऱ्या आपण बाळगा अशी सर्वांना मी राज्य सरकारच्यावतीने नम्र विनंती करीत आहे.