फलटण शहरातील लक्ष्मी नगर, येथील न भू क्रमांक 6472, प्लॉट नंबर 2 या प्रशासकीय इमारतीच्या शेजारी राम प्राईड बिल्डिंगचे बांधकाम चालू आहे .
सदर बांधकाम व्यावसायिकाने नगरपालिकेचे नवीन डीसीआर रुल याचे उल्लंघन करून रस्ता व बिल्डिंगचे सामासिक अंतर नियमाचा भंग करून सेटबॅक मध्ये ज्यादा बांधकाम केलेले आहे या बांधकामाबाबत फलटण मधील सतर्क नागरिकांनी फलटण नगरपालिकेकडे बांधकाम बेकायदेशीर असले बाबत व बांधकाम नियमावलीचे उल्लंघन करून बिल्डिंग काम चालू असले बाबत तक्रार फलटण नगरपालिका व जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेली आहे, व बेकादेशीर बांधकाम बाबत फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड व नगर रचना पाटील साहेब यांच्या निदर्शनास आणून दिले, त्यांनी देखील या बांधकामाची जागेवर येऊन पाहणी केली त्यांची देखील बांधकाम बेकायदेशीर असल्याची जवळजवळ खात्री झालेली आहे .
असे असताना देखील संबंधित बांधकाम व्यवसायाकडून नगरपालिकेशी आर्थिक संगणमत करून त्यांनी या बिल्डिंग कडे व चालू असलेल्या बांधकामाकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केलेला आहे .या बिल्डिंग चे बांधकाम फलटण नगरपालिका प्रशासाक म्हणून काम पाहणारे मुख्याधिकरी संजय गायकवाड बिल्डिंग चे बेकायदेशररित्या बांधलेले बांधकाम पाडणार का ?याकडे फलटणमधील नागरिकांमध्ये कुजबूज सुरू आहे.