महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी:
मागील वर्ष माहे मार्च २० साला पासून कोरोना संकटाने थैमान घातले आहे. त्यामुळे सामाजीक आरोग्य धोक्यात आले असून प्रचंड प्रमाणात जीवितहानी झाली असून लोकांचे जगणे मुश्कील झाले आहे. याचा विचार करून कराड नगरपालिकेने लॉकडाऊन काळातील घरपट्टीत सवलत दयावी. अशी मागणी कराड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पत्रकाद्वारे करण्यात आली आहे.
याबाबतचे पत्र मनसेचे योगेश खडके यांनी कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री रमाकांत डाके यांना दिले आहे.
या पत्रकात म्हटले आहे की, गेले वर्षभर सर्वत्र टाळेबंदीची भीषण परिस्थिती अद्यापही आहेच. कोरोनाच्या रुग्णसंख्येसह जीवितहानी रोखण्याकरता. कराड नगरपालिका हद्दीत वारंवार कडक लॉकडाऊन लावण्यात आले होते. तसेच अद्यापही चालू वर्ष २१ मध्ये गेले ४५ दिवसाहून अधिक काळ कडक लॉकडाऊन आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक जीवनामानावर टाळेबंदी चा विपरीत प्रभाव पडून सर्वसामान्य रहिवाशांचे आर्थिक जीवन विस्कळीत झाले आहे. संपुर्ण बाजारपेठ, व्यापारी दुकाने, आस्थापने, उद्योग, व्यावसायिक, फेरीवाले, रिक्षावाले,यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. यासर्व बाबींमूळे कराड पालिकेच्या क्षेत्रातील मालमत्ताधारकांना दिलासा देणे करता. सन २०-२१ व २१-२२ या आर्थिक वर्षांतील घरपट्टी बिलात संपूर्ण माफी किंवा ५०% सवलत किंवा तिमाही माफी तसेच थकीत घरपट्टी वरील व्याज माफ करण्यात यावे. तसेच पाणीपट्टी बिलात ३०% सवलत देण्यात यावी.
याबाबत त्वरित सकारात्मक कार्यवाही करून कराडकर नागरिकांना लॉकडाऊन काळात दिलासा देण्यात यावा. अशी मागणी पत्रकाद्वारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कराड शाखेतून करणेत आली. या पत्रकात मनसेचे योगेश खडके , राज्य कार्यकारणी सदस्य मनकासे, विनायक भोसले मनवीसे शहर , स्वप्नील गोतपागर, अमोल खाडे, मनसे सैनिक, चंद्रकात पवार सचिव, भानुदास डाईंगडे, यांच्यासह पदाधिकारी यांचे सह्या आहेत.