कळंब प्रतिनिधी शहाजीराजेे भोसले
कळंब ( ता. इंदापूर ) येथील १९ वर्षाचा तरुणाचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध आरोग्य विभागाने व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू करण्यात आला होता. बारामतीचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्यां आदेशानुसार पं .स . गटविकास अधिकारी विजयकुमार परिट , तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. सुवर्णा पोळ , तालुका विस्तार अधिकारी दिलिप जगताप , वालचंदनगर पोलिस स्टेशनचे स.पो.नि. दिलीप पवार , प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.जीवन सरतापे , समुह वैद्यकीय अधिकारी डाॅ. संतोष पाटील , आरोग्य सेवक संदीप एकतपुरे , सेविका वैशाली राक्षे , ग्रामविकास अधिकारी घोगरे , आशा स्वंयसेविका व ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांनी विशेष परिश्रमांतून गावाचा सर्व्हे केला.
कळंबमधील कोरोना पॉझिटीव्ह आढळून आलेल्या रूग्णाच्या संपर्कातील कळंबमधील २ व परिसरातील १० जणांचे नमुने तपासणी साठी पाठविण्यात आले होते , त्या सर्वांचे नमुने निगेटिव्ह आल्याने परिसरातील नागरिकांमधील भीतीचे वातावरण काही प्रमाणात कमी झाले आहे.



































