१ टक्का व्याजदर कपातीचा निर्णय जाहीर
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : पिंपोडे बुद्रुक
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक पतसंस्था ही सभासदांच्या हिताचे निर्णय घेत असून शिक्षकांसाठी ती लाभदायी ठरेल असे प्रतिपादन जावली तालुका शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या संगणकीकरण शुभारंभप्रसंगी राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी केले.शिक्षक पतसंस्थेच्या संगनकीकरण शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.शिंदे म्हणाले,अल्पावधीतच जावली शिक्षक पतसंस्थेने प्रगती साधली असून सभासदांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत.संस्थेचा कारभार अतिशय उल्लेखनिय असून येत्या काळात संस्था अधिकच बळकट होईल.संस्थेचे विद्यमान चेअरमन,व्हा.चेअरमन,सर्व संचालक मंडळ सभासद हिताच्यादृष्टीने निर्णय घेत आहेत.
याप्रसंगी शिक्षक बँकेचे संचालक किरण यादव म्हणाले, बँकेच्या आणि पतसंस्थेच्या व्याजदराची तुलना करता पतसंस्था सभासदांच्या फायद्याचा विचार करत आहे.आगामी काळात जावली शिक्षक पतसंस्था निश्चितच सभासदांसाठी फायद्याची ठरणार आहे.संस्था राबवत असलेले उपक्रम नावाजण्यासारखे असून सर्वसामान्य सभासदांच्या हिताचे आहेत.
याप्रसंगी पतसंस्थेच्या सर्व संचालकांनी येत्या १ ऑक्टोबर पासून व्याजदर कपात करण्यात येणार आहे. इथून पुढे ११.५० टक्के या व्याजदराऐवजी १ टक्क्यांची कपात करून ती १०.५० टक्के इटका करण्याचा एकमुखी निर्णय घेतल्याचे जाहीर केले.
याप्रसंगी पतसंस्थेचे चेअरमन श्री.धीरेश गोळे,शिक्षक समिती तालुका अध्यक्ष सुरेश चिकणे, सरचिटणीस तानाजी आगुंडे,कार्याध्यक्ष विजय बांदल,संचालक गजानन वारागडे,मदन बोराटे,उस्मान मनेर,राजेंद्र मोहिते,गणेश कदम आदी उपस्थित होते.सचिव विशाल जमदाडे यांनी आभार मानले.
संस्थेचे संचालक श्री. अनिलजी दरेकर यांनी यावेळी संस्था इमारतीसाठी त्याच्या विद्यानगर या ठिकाणची १ गुंठा जागा विनामोबदला देण्याचे जाहीर केले