लोणीभापकर प्रतिनिधी संजय कुंभार
बारामती तालुक्यातील मुढाळे नजीक लोखंडवाडी या ठिकाणी गेल्या १६ वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून गेल्या ४ वर्षापासून राम नामाचा अखंड जप चालू आहे. हा रामनामाचा जप पहाटे साडे तीन ते सहा वाजेपर्यंत चालतो. (रामफेरी) नगरप्रदक्षिणा, नित्यपूजा, हनुमान चालीसा, मारुती स्तोत्र व संध्याकाळी हरिपाठ अशा पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम घेतले जातात. याठिकाणी यावर्षी दिंडी सोहळा नसल्यामुळे आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी शासनाचे नियम पाळून मारुती मंदिरामध्ये ज्ञानोबा तुकारामच्या गजरात अकरा प्रदक्षिणा घालण्यात आल्या. विनापूजन, सांप्रदायाच्या नियमानुसार पताका पूजन, टाळपूजन तुलसीमाता पूजन करून हरिपाठ घेण्यात आला.
पूर्वीच्या काळी या परिसरात पाण्याची बिकट अवस्था गावात होती रामनामामुळे काही गोष्टीत बदल घडून आला आहे. राम नामामुळे तरूण व्यसनापासून दूर असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
वैकुंठवासी ह.भ.प.भगवान महाराज सस्ते, गुरुवर्य ह.भ.प.लक्ष्मण महाराज देशमुख (बुलढाणा) बालयोगी पांडुरंग महाराज लोणी भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात येतो.यामध्ये मुढाळे तसेच लोखंडवाडी ग्रामस्थांचा सहभाग असतो.अशी माहिती यावेळी संयोजकांच्या वतीने देण्यात आली