महाराष्ट्र न्यूज कळंब प्रतिनिधी शहाजीराजे भोसले
ग्रंथ हेच गुरू समजले जाते , मात्र ग्रंथालयातील पुजारी असलेल्या सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी यांच्या प्रपंचाची राज्य शासनाच्या उदाशिन धोरणामुळे दैना झाली आहे . सर्वसामान्यांनापर्यंत तरी त्यांची कर्म कहाणी पोहचावी , यासाठी ग्रंथालय कर्मचारी यांनी स्वखर्चाने , कसं जगावं ? हा लघुपट काढला आहे.
राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांना शासनाकडून दोन टप्प्यांत अनुदान मिळते . या अनुदानातून पुस्तक खरेदी , ग्रंथालय इमारत दुरुस्ती , विविध कार्यक्रम व कर्मचारी यांचे मानधन दिले जाते. २००९ पासून हे अनुदान वाढवून मिळाले नाही. मात्र गेल्या अकरा वर्षांत महागाई दुप्पट झाली आहे. ग्रंथालय कर्मचारी यांना तुटपुंज्या मानधनावर संसाराचा गाढा ओढावा लागत आहे. कित्येक कर्मचारी डायबिटीस , रक्तदाब आदी विकारांनी ग्रासले आहे , त्यांच्याकडे वैद्यकीय खर्चासाठी पैसे नाहीत .
तुटपुंज्या मानधनातून संसार चालवताना भोगाव्या लागलेल्या यातना लोकांना कळाव्यात असे त्यांना वाटू लागल्याने लघुपट काढण्याचा विचार आला. प्रसिध्द दिग्दर्शक राजन कोनवडेकर यांनी तांत्रिक मदत केली. बाकी सर्व भुमिका ग्रंथालय कर्मचारी यांनी करायच्या ठरविल्या. नगर जिल्ह्यातील कर्जतचे पन्हाजी कदम यांनी पुढाकार घेऊन निर्माता होण्याचे ठरविले. ते अहमदनगर जिल्हा ग्रंथालय कर्मचारी विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. राज्य ग्रंथालय कृती समितीचे कार्यवाह रवी कामत यांनी पटकथा लिहली. या लघुपटाचे कोल्हापूर येथील भुदरगड येथे सहा दिवस छायाचित्रण झाले. एका ग्रंथालय कर्मचारी याची प्रापंचिक व्यथा या लघुपटात चित्रीत झाली आहे. हा लघुपट पाहून तरी राज्य शासनाला ग्रंथालय कर्मचारी यांची व्यथा कळेल अशी आशा कर्मचारी यांना आहे.
शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचारी यांच्या जीवनातील सत्यघटनेवर आधारित तयार झाला लघुपट






















