महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : प्रतापसिंह भोसले (फलटण )
5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून सातारा जिल्हा बँक, सासवड़ शाखा प्रमुख श्री. गणेश पाटणे यानी बँकेच्या विविध कर्ज योजना व बँकेने नुकतीच चालू केलेल्या UPI PAYTM ग्राहक सेवेची माहिती उपस्थित सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना या कार्याक्रमावेळी दिली.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत घोषित केलेल्या ‘सैलरी पैकेज’ योजनेचा सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी लाभ घ्यावा, असे त्यांनी आव्हान केले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या साठी रुपये 25 लाखांपर्यंत मध्यम मुदत पगार तारण कर्ज योजना व सेव्हिंग ओव्हर ड्राफ्ट कर्ज योजना शिक्षकांसाठी किफायातशीर आहे, व या कर्ज योजनेमधे कोणतेही प्रोसेसिंग शुल्क आकारले जात नाही. तसेच शिक्षकांसाठी रुपये 30 लाखांपर्यंत अपघात विम्याचे संरक्षणही मिळणार आहे. तसेच नविन वाहन कर्ज योजने मधे सद्यस्थितीमधे कमी झालेल्या व्याजदरांमुळे सर्वच ग्राहकांचा फायदा होणार असल्याचेही श्री. पाटणे यांनी सांगीतले.
या कार्यक्रमाचे नियोजन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सरकाळे साहेब यांचे सूचने नुसार व फलटण विभागीय कार्यालयाचे विभागीय विकास अधिकारी श्री. अविनाश खलाटे साहेब व श्री. बी एस बरकडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाच्या वेळी श्रीराम एज्यूकेशन सोसायटी संचलित, महात्मा फुले हायस्कूल सासवड़ च्या प्राचार्या सौ. काकडे मैडम, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सासवड़ शाखेतील स्टाफ सौ. सोनाली पाटणे, श्री. विकास अभंग, श्री. निलेश साळुंखे व श्री. विशाल धुमाळ तसेच श्री. विजय जगताप यांनी विशेष परिश्रम घेतले.