महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : मोरगिरी
मोरणा विभागातील कोकिसरे सोसायटी ही पाटणकर गटाकडे असून त्यावर अध्यक्ष विश्वास देशमुख व उपाध्यक्ष देवबा जाधव हे कामकाज पाहत आहेत मात्र त्यांच्यावर देसाई गटाच्या व काही पाटणकर गटाच्या संचालकांनी २९ जून रोजी अविश्वास ठराव अर्ज पाटण साह्यक निबंधक यांच्याकडे सादर केला होता त्या नुसार पाटण साह्यक निबंधक यांनी सोसायटीच्या संचालकांची मीटिंग गुरूवार दि १६ जुलै रोजी बोलावली होती या मीटिंग मध्ये देसाई गटाकडून सात संचालक उपस्थित होते.
तर सताधारी पाटणकर गटाकडून विद्यमान अध्यक्ष व उपाध्यक्ष हेच उपस्थित होते या वेळी साह्यक निबंधक संजय पवार यांनी कोरोमच पूर्ण नाही त्यामुळे अविश्वास ठराव मंजूर होऊ शकत नाही अशी माहिती दिली त्यामुळे कोकिसरे सोसायटी अविश्वास ठराव बारगळला मात्र देसाई गटाकडे त्यांचे मूळचे चार संचालकच असूनही सोसायटीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या विरोधात अविश्वास बाबत सादर केलेला प्रस्ताव म्हणजे देसाई गटाचे धाडसच म्हणावे लागेल तर माजी पंचायत समिती सदस्य नथुराम कुंभार सर यांच्या करिष्मा मुळे निबंधक यांनी बोलवलेल्या मीटिंग मध्ये देसाई गटाच्या बाजूने तब्बल सात संचालक उपस्थित होते तर पाटणकर गटाची सत्ता असूनही या मीटिंगला अवघे दोन जणच उपस्थित होते .
मात्र कोरम पूर्ण अभावी कोकिसरे सोसायटीच्या अध्यक्षांना वरील अविश्वास ठराव बारगळला असला तरी संचालकांचा अध्यक्षांनवरचा विश्वास मात्र मरगळला आहे अशी माहिती संचालक राजू नारकर यांनी दिली तर ते पुढे म्हणाले की विद्यमान अध्यक्षांनी डोंगर पडीक जमिनी वर ऊस बागायती क्षेत्र दाखवून लाखो रुपये कर्ज घेतले आहे सोसायटीत भोंगळ कारभार असून संस्था अडचणीत आणण्याचे काम यांनी केले आहे त्यामुळे इतर संचालक अध्यक्ष यांच्या गलथान कारभारामुळे अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे म्हणूनच देसाई गटाने धाडस करून अविश्वास प्रस्ताव सादर केला होता यात जरी अपयश आले असले तरी याचा कायमचा पाठपुरावा केल्या शिवाय गप्प बसणार नाही असेही त्यांनी सांगितले शेवटी म्हणाले की सोसायटीला दान दिलेल्या खुर्च्या, टेबल हेही साहित्य अध्यक्ष उचलून आपल्या घरी घेऊन जात असतील तर असले दानशूर व्यक्तिमत्व असलेले अध्यक्ष काय कामाचे म्हणूनच हा अविश्वास ठराव सादर केला होता असेही राजू नारकर यांनी सांगितले एकंदरीत देसाई गटाने आखलेले मनसुबे उधळून लावण्यात विद्यमान अध्यक्ष विश्वास देशमुख यशस्वी झाले आहेत तर देसाई गटाचे प्राबल्य वाढलेले आहे हे दाखवून देण्यात देसाई गट यशस्वी झाला आहे.
देशमुखांची आयडिया म्हणावी लागेल लयच भारी.
सोसायटी अध्यक्ष विश्वास देशमुख यांच्याकडे हकाचे दोन संचालक असून सुध्दा त्यांनी जाणून बुजून त्यांना मीटिंगला हजरच्च राहू दिले नाही पर्यायी मीटिंग चा कोरमच पूर्ण होऊ शकला नाही तर देसाई गटाचा एक संचालक गेले चार दिवसापासून गायबच होता पर्यायी तो अविश्वास ठराव मीटिंगला तो हजर राहिला नाही त्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा अविश्वास ठराव बारगळला त्यामुळे देशमुख बचावले मात्र देसाई. गटाचा गायब होणारा संचालक याचा विषय मात्र गुलदस्त्यातच राहिला आहे त्यामुळे देशमुखांची आयडिया ही लयच भारी म्हणावी लागेल.
कुंभार सरांची जिद्द व चिकाटी परत आली दिसून
माजी पंचायत समिती सदस्य नथुराम कुंभार सर यांनी सोसायटीची सत्ता हातात नसून सुधा गेल्या चार महिन्यां पूर्वी मंत्री शंभूराज देसाई यांच्या साठी जिल्हा बॅंक निवडणूक कामी एकहाती ठराव मंजूर करून घेतला होता तोच करिष्मा राखत कुंभार सर यांनी आपली असलेली चार संचालक याच्यात तीन संचालकांची भर घालत सात संचालक केले मात्र कोरम पूर्ण अभावी अविश्वास ठराव बारगळला. अन्यथा कुंभार सर यांच्या व्यवूर्रचनेत अध्यक्ष उपाध्यक्ष यांना पदावरून निश्चितच खाली यावे लागले असते मात्र यातून कुंभार सरांची जिद्द व चिकाटी परत दिसून आली हे मात्र निश्चित