महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले (कळंब-इंदापूर)
इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथील श्री . वर्धमान विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयास कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच शिक्षक ,विद्यार्थी व पालक यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव वालचंदनगर ग्रामपंचायतीचे वतीने सॅनिटायझरची ऑटोमॅटिक फवारणी मशीन , थर्मामीटर व पल्स ऑक्सिमीटर आदी साहित्य नुकतेच भेट देण्यात आले .
सरपंच छाया मोरे , उपसरपंच हर्षवर्धन गायकवाड यांच्या हस्ते साहित्य प्राचार्य नवनाथ जाधव यांचेकडे सुपूर्द करण्यात आले . साहित्य वाटप याप्रसंगी उपमुख्याध्यापक बाळासाहेब पडारी , मुख्य लिपीक आत्माराम लोंढे , पर्यवेक्षक हनुमंत कुंभार , ग्रामविकास अधिकारी शिवाजी काळे , सदस्या पद्दमावती परीट आदी उपस्थित होते .कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे पंकज पाटील यांनी आभार मानले .