
निघाली होती व 27 फेब्रुवारी रोजी
श्री क्षेत्र प्रति शिर्डी शिरगाव येथे साई बाबां च्या मध्यान्ह आरती करिता पोचली,
पायी पालखी दिंडी नवीन शेवे येथुन निघाल्या नंतर तिचे जागोजागी जोरदार स्वागत झाले ,पायी पालखी दिंडी दास्तान फाटा येथे पोचल्या वर दिंडीचे साई मंडळ चिरले च्या वतीने समाधान माळी व एकनाथ ठाकूर यांच्या वतीने करून पदयात्रीना चहा नाष्टा देण्यात आला,गव्हाण फाटा येथे पायीपालखी दिंडी पोचल्या वर साई देवस्था न वहाल च्या वतीने देवस्थान चे अध्यक्ष श्री राविशेठ पाटील यांनी दिंडीचे जोरदार स्वागत करून पदायात्री ना पुढील प्रवासा करिता शुभेच्छा दिल्या
दुपारी पायी दिंडी बंबावी पाडा येथे मध्यान्ह आरती करिता पोचल्यावर दिंडीचे स्वागत सागर मढवी व परिवार यांच्या कडून करून महाप्रसाद करून पायी पालखी दिंडीने प्रति शिर्डी शिरगावकडे प्रस्थान केले ,व आज दिनांक 27 फेब्रुवारी 2022 रोजी मध्यान्ह आरती करिता मंदिरात पोचली, यावेळी देवस्थान प्रमुख विश्वस्त तथा माजी आमदार श्री प्रकाश देवळे सचिव सौ सपना लालचंदानी यांच्या वतीने दिंडीचे जोरदार स्वागत केले, यावेळी संचालिका सौ, शालिनी ताई रामचंद्र घरत, अध्यक्ष श्री विजय पाटील ,सल्ल्गार श्री रामचंद्र घरत ,कार्याध्यक्ष हरेश्वर घरत ,रामदास म्हात्रे ,मिलिंद तांडेल ,गणेश ठाकूर ,दिलीप कडू ,अजय दणें,सुनिल घरत ,सुनिल पाटील ,हरेश्वर ठाकूर , श्री राकेश मुगळे,जसखार सरपंच श्री दामुशेठ घरत ,सौ ,मनिषा घरत सौ ,नम्रता ठाकूर, सौ,संगीता घरत ,सौ,दिक्षिता घरत, आदीं सह महिला ,पुरुष पदायात्री मोठ्या संख्ये ने उपस्थित होते,
पायी पालखी दिंडी सांगता प्रित्यर्थ 5 मार्च रोजी नवीन शेवे येथे महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व साई भक्तांनी दर्शनाचा व भांडारा चा आस्वाद घेण्याचे आवाहन श्री साई शक्ती मंडळ शेवे च्या वतीने करण्यात आले आहे






















