फलटण प्रतिनिधी:- १७ सप्टेंबर २०२२ ते २ ऑक्टोंबर २०२२ दरम्यान महाराष्ट्र शासन महसूल विभागाकडून सेवा पंधरावडा अतंर्गत तालुकास्तरीय फेरफार अदालतचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप व तहसीलदार समीर यादव यांनी दिली आहे.
दिनांक २३ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १० ते २ वाजेपर्यंत दरबार हॉल , उपविभागीय अधिकारी कार्यालय फलटण याठिकाणी फेरफार अदालतचे आयोजन करण्यात आले असून फलटण तालुक्यातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान फलटण महसूल विभागाकडून करण्यात आले आहे.
यावेळी या अदालत कार्यक्रमांमध्ये १. प्रलंबीत सर्व फेरफार निकाली काढणे २. प्रलंबीत सर्व फेरफारांची नोंद ऑनलाईन सिस्टीमला घेणे ३. नागरिकांकडून फेरफारासाठी अर्ज स्वीकारुन नोंद घेणे ४. फेरफाराबाबतच्या नागरिकांच्या अडचणी सोडवणे ५. मयत शेतकरी / खातेदार यांच्या वारस नोंदीसाठी अर्ज स्वीकारुन वारस नोंदी करणे ही कामे होणार असून सर्व प्रकारच्या नोंदीसाठी आवश्यक अर्ज या ठिकाणी मोफत उपलब्द्ध होणार आहेत तसेच वारस नोंदणीसाठी आवश्यक प्रतिज्ञापत्र ( Affidevit ) करणेकमी सेतू कार्यालयात स्वतंत्र व्यवस्था करणेत आली आहे.
याकरीता १. वारस नोंदीचे बाबतीत मृत व्यक्तीचा मृत्यू दाखला व प्रतिज्ञापत्र, २. अर्जदाराचे आधारकार्ड, ३. इतर नोंदीचे बाबतीत आवश्यक कागदपत्रे इकरार , खरेदीखत हक्कसोडपत्र इत्यादी, ४. विहित नमुन्यातील अर्ज ही आवश्यक कागदपत्रे घेऊन यावे अधिक महिती करीता महसूल नायब तहसिलदार एन. डी. काळे यांना (९६२३६८४५२५) संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.






















