महाराष्ट्र न्यूज जळोची प्रतिनिधी दिगंबर पडकर
बारामतीत कोरोनाच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज बारामतीत आणखी ४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ठ झाले आहे. तर काल पाँझिटिव्ह आलेल्या कन्हेरी येथील ४४ वर्षीय महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला7ब आहे.
काल घेतलेल्या ६९ स्बँव नुमन्यांपैकी ४४ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून, त्यामध्ये बारामती शहरातील ३ जणांचा अहवाल पाँझिटिव्ह आला आहे. तर निंबूत येथील एका जेष्ठ नागरिकांचा अहवाल पाँझिटिव्ह आला आहे. उर्वरित २५ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.पाँझिटिव्ह आलेल्या अहवालात शहरातील कसबा येथील ३५ वर्षीय तरुण तर वणवे मळा येथील भाजी विक्रत्याचे वडील ८५ वर्षाचे वृध्द व गुरुकुल सोसायटी शिवनगर, भिगवण रोड बारामती येथील ५४ वर्षाच्या पुरुषाचा यात समावेश आहे.