महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले कळंब – (इंदापूर)
इंदापूर तालुक्यातील थोरातवाडी गावचे रहिवासी व ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते केशव सदाशिव नगरे याची राष्ट्रवादी पक्षाची असलेली बांधिलकी व सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात केलेल्या प्रामाणिक कार्याची नोंद घेवून पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ग्रंथालय सेलच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली .

केशव नगरे यांना ग्रंथालय सेल जिल्हाध्यक्षपदी निवडीचे पत्र राष्ट्रवादी पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी सपूर्द केले .इंदापूर तालुक्यातील ग्रंथालय चळवळीतील पदाधिकारी यांनी त्यांचे निवडचे अभिनंदन केले .
यावेळी केशव नगरे यांनी पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करणार असल्याचे सांगितले .

































