महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी (वालचंदनगर) : अमोल राजपूत
इंदापूर तालुक्यातील कोरोनाची साखळी तुटणे गरजेचे आहे. आरोग्य विभाग,पोलीस प्रशासन,आणि जनतेच्या काळजीने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला जाईल. तालुक्यातील जनतेने शासनाच्या “माझे कुटुंब माझी जबाबदारी” साठी आरोग्य,आशा स्वयंसेवीका, पोलीसदलासह सह अन्य खात्यातील कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे.या कामात हलगर्जीपणा केल्यास कुणाचीही गय केली जाणार नाही”. असे मत सोलापुरचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी व्यक्त केले.
वालचंदनगर ( ता.इंदापूर ) येथे वालचंदनगर कंपनीचे लालचंद हिराचंद मेडिकल सेंटर येथे कोवीड सेंटरचे उद्घाटन कार्यक्रम कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक चिराग दोशी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी कोविड केअर सेंटरच्या आढावा बैठकीच्या अध्यक्ष स्थानी सोलापुरचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे उपस्थीत होते.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाअध्यक्ष प्रदिप गारटकर,वालचंदनगर कंपनीचे मनुष्यबळ विभागाचे अधिकारी धिरज केसकर,फॅक्टरी मॅनेजर व्ही. पी. शुक्ला,पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या वैशाली पाटिल, प्रतापराव पाटील,पंचायत समितीच्या सदस्या शैला फडतरे,सारीका लोंढे ,कंपनीचे सुरक्षा अधिकारी शैलेश फडतरे, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार सोनाली मेटकरी, गटविकास अधिकारी विजय परीट, तालुका वैद्यकीय अधिकारी प्रशांत महाजन,पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर,सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, जीवन माने, डाॅक्टर विकस शहा, अभिजित रणवरे,वालचंदनगर शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अमरसिंह निंबाळकर, विजय कांबळे, तुषार घाडगे, प्रवीण बल्लाळ, रामचंद्र कदम,मधुकर पाटील,आत्माराम लोंढे,योगेश डोंबाळे, सागर मिसाळ, मान्यवर उपस्थित होते.
यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत अंथुर्णे सारख्या मोठ्या गावात रुग्णांची संख्या का कमी होत नाही आणि कोरोनाची साखळी का तुटत नाही याबाबत खंत व्यक्त केली राज्यमंत्री भरणे यांनी धारेवर धरत आवश्यक ती मदत करुन रुग्णांची संख्या कमी झाली पाहीजे. काही ठिकाणी कोविडचे रुग्ण खाजगी वाहनाने जात असुन आरोग्य विभागाकडे रुग्णवाहिका नाही असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर आरोग्य प्रशासन गप्प राहिले. भिगवण भागातही मोठे मार्केट असल्याने आजुबाजुच्या गावांदेखील कोवीड संसर्गाचा धोका होत आहे. याच बरोबर याठिकाणी पुन्हा तपासण्या वाढवाव्यात अशी मागणी होत आहे
इंदापूर तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांच्या बेडसाठी बेडशीट नसल्याचे तालुका आरोग्य अधिकारी यांनी सांगितले त्यावर तहसीलदार यांनी मला माहिती नसल्याचे सांगितल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी अक्षरशः तहसीलदार यांना हात जोडले.
मौजे अंथुर्णे गावाची कोरोना साखळी तोडण्यासाठी पुर्ण गाव बंद असणे जरुरीचे आहे. कोवीड संदर्भात तपासणी होत असताना गाव बंद असणे जरुरीचे आहे. मात्र असे होताना दिसत नाही. या संदर्भात बोलताना प्रांतधिकारी कांबळे म्हणाले कि ,गरज पडल्यास १ दिवसाचा कंटेमेंट झोन करुन सर्व्हे करण्याच्या सुचना यावेळी दादासाहेब कांबळे यांनी दिली.
यावेळी पालकमंत्री दत्रात्रय भरणे म्हणाले कि, कोवीड सेंटर भागात असलेल्या अडचणी आम्ही सोडवत तर आहे. मात्र एक सामाजीक बांधीलकी म्हणुन सामाजीक संघटना , दानशुर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे करणे जरुरीचे आहे.इंदापूर तालुक्यातील सपकळवाडी गावाचा आदर्श घेणे गरजेचे आहे. असे सांगत गावोगावी मास्क न वापरणाऱ्यांना सोडू नका. मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या कडक सुचना यावेळी भरणे यांनी दिल्या.