लोणंद प्रतिनिधी/
लोणंद नगरपंचायत निवडणुकीच्या उर्वरित ४ प्रभागांची निवडणूक सर्वसाधारण करण्यात आल्यानंतर नगरपंचायतीच्या ४ जागांसाठी ४१ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. ४ जानेवारी २०२२ रोजी झालेल्या छाननी दरम्यान २४ उमेदवार पात्र ठरविण्यात आले होते. उमेदवारी अर्जांची माघार घेण्याची १० जानेवारी २०२२ ही अंतिम तारीख होती. या तारखेपर्यंत ५ उमेदवारांनी माघार घेतली असून; १९ उमेदवार हे रिंगणात राहिले असून; हे उमेदवार नगरपंचायतीच्या ४ जागांसाठी निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
प्रभागनिहाय व पक्षनिहाय आज पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल केलेले उमेदवार पुढील प्रमाणे आहेत. प्रभाग क्र.१ सर्वसाधारण महिला या प्रवर्गातून शेळके दिपाली संदीप (भाजपा), शेळके प्रतिभा राहुल (काँग्रेस), शेळके वर्षा हनुमंत (राष्ट्रवादी), माचवे अनिता बब्रुवान (शिवसेना), असे ४ उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. प्रभाग क्र.२ मधून सर्वसाधारण महिला या प्रवर्गातून बागवान आसिया साजिद (काँग्रेस), शेळके निर्मला दादासाहेब (राष्ट्रवादी), जाधव राधिका संजय (शिवसेना), बुटीयानी संगीता किशोर (भाजपा), मनिषा चंद्रकांत शेळके (अपक्ष) असे ५ अर्ज दाखल केलेले आहेत. प्रभाग क्र.११ सर्वसाधारण प्रवर्गातून शिरतोडे विश्वास सदाशिव (शिवसेना) कुचेकर उत्तम शामराव (काँग्रेस), बोडरे भरत जयवंत (राष्ट्रवादी), जावळे श्रीकुमार सुरेश (भाजपा) भंडलकर शरद वसंतराव (अपक्ष)असे ५ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत; तर प्रभाग क्र.१६ सर्वसाधारण प्रवर्गातून पवार गणेश शंकर (शिवसेना) व्हावळ प्रवीण बबनराव (काँग्रेस) कचरे विनया दत्तात्रेय (राष्ट्रवादी) क्षीरसागर प्रदीप नामदेव (भाजपा) पटेल जावेद शाहाबुद्दीन (अपक्ष) असे अर्ज दाखल करण्यात आले आहेत.