महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले (कळंब – इंदापूर)
ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणे या विषयात मुंबई व औरंगाबाद खंडपीठापुढे दाखल एकूण ८ विषयावर सुनावणी करणेच्या शासन विनंतीवरून पुढील एकत्रित सुनावणी सोमवार ( दि.२७ जुलै ) घेण्याचे आदेश सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने दिले असलेचे अॅड . शिवानी शमेल यांनी सांगितले .राज्यातील मुदत संपलेल्या १४,२३४ ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणूकीबद्दल दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी झाली .
यापुढील काळात शासनाने प्रशासक नियुक्तीत कुठलाही निर्णय घेतला तरी तो या प्रकरणातील सर्व सुनावणी नंतर न्यायालयाने दिलेल्या पुढील निर्णयास बंधनकारक राहिल .मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन .एम . जामदार व जस्टिस अभय आहुजा या दोन न्यायाधिशांच्या खंडपीठापुढे विलास कुंजीर व अशोक सातव या याचिकेकरतेंच्या वतीने अॅड. शिवानी शमेल यांनी बाजू मांडली .ग्रामपंचायत प्रशासकाचे प्रकरण शासनाच्या अंगलट येतेय अशी सध्या तरी स्थिती आहे . प्रशासक बाबतीत शासनाने कुठलाही निर्णय घेतला तरी तो आता न्यायालयाच्या या प्रकरणाशी संबंधित निकालाच्या कार्यकक्षेत येणार आहे . त्यामुळे आता शासनालाही जपून पावले टाकावी लागणार आहेत .