महाराष्ट्र न्यूज बारामती प्रतिनिधी विनोद गोलांडे
सोमेश्वर आयसीयू (वाघळवाडी-सोमेश्वरनगर) उपक्रम पोलीस, पत्रकार आणि आरोग्य कर्मचान्यांना उपचारात
२५ टक्के सवलत. बारामती तालुक्यातील पोलीस, पत्रकार आणि आरोग्य
कर्मचारी यांना कोणत्याही आजारावरील उपचारात २५ टक्के सूट देण्याचा निर्णय बारामती तालुक्यातील सोमेश्वर आयसीयु(वाघळवाडी-सोमेश्वरनगर) या
हॉस्पिटलने घेतला आहे.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती
प्रमोद काकडे, सोलापूर बस आगरप्रमुख रमाकांत गायकवाड , सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब गायकवाड आणि ऋषिकेश गायकवाड यांच्या हस्ते पोलीस, पत्रकार आणि अश्या वर्कर ,आरोग्य कर्मचा-यांना हॉस्पिटलची अधिकृत पत्र देण्यात आले.
यावेळी बारामती तालुका राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष विक्रम भोसले, वाघळवाडीचे उपसरपंच जितेंद्र सकुडे, सदस्य हेमंत गायकवाड, मुरूमचे उपसरपंच निलेश शिंदे,करंजे सोसायटी चे अध्यक्ष अनिल गायकवाड,करंजेपुल ग्रामपंचायत सदस्य निलेश गायकवाड, सुहास गायकवाड, आकाश सावळकर ,डॉ अनिल देशमुख ,डॉ सूरज सोनवलकर आदी मान्यवर
उपस्थित होते, वडगाव निंबाळकर पोलीस
ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे आणि
पोलीस हवालदार महेंद्र फणसे यांनी तर पत्रकारांच्या वतीने बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश जगताप,पत्रकार संतोष शेंडकर, हेमंत गडकरी, युवराज खोमणे आणि विनोद गोलांडे यांनी या पत्रांचा स्वीकार केला.