महाराष्ट्र न्यूज जळोची प्रतिनिधी दिगंबर पडकर
राज्यात अनेक ठिकाणी लॉकडाऊन असल्यामुळे अजित पवार यांनी करोनाच्या ऊदभवलेल्या परिस्थितिमुळे कोणीही वाढदिवस साजरा करू नये. असे आदेश दिल्यामुळे राज्यात सर्वत्र शांतता असूनही बारामतीच्या उपनगराध्यक्ष सौ.तरन्नुम सय्यद व मुस्लिम बँकेचे संचालक अल्ताफ सय्यद यांनी बारामती येतील एकता महिला नागरी सहकारी पतसंस्था गुणवडी रोड या ठिकाणी दुपारी गोरगरीब नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटप करण्यात आले. या किटमध्ये पाच किलो गहू ,पाच किलो तांदूळ, अर्धा किलो पोहे ,अर्धा किलो शेंगदाणे, चहा पावडर , एक किलो साखर, एक लिटर तेल, एक किलो तूर डाळ शा वस्तुंचा समावेश असलेल्या जीवनावश्यक वस्तुंच्या किटचे वाटप करण्यात आले.
सदर प्रसंगी बारामतीचे माजी उपनगराध्यक्ष, विद्यमान नगरसेवक नवनाथ बल्लाळ, नगरसेवक सत्यव्रत काळे, नगरसेविका रुपाली गायकवाड, नगरसेविका ज्योतीताई सरोदे, यांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाचे आयोजन बारामती नगरीच्या.उपनगराध्यक्षा सौ. तरन्नुम सय्यद यांनी केले होते. सदर प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक नवनाथ बल्लाळ यांनी अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शिक्षण मंडळाचे माजी सभापती हाजी कमरुद्दीन सय्यद व मुस्लिम बँकेचे विद्यमान संचालक यांनी अजित पावर जुन्या आठवणींना उजाळा देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांच्या, शुभहस्ते केक कापण्याचा कार्यक्रम पार पडला.