महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी (कळंब – इंदापूर): शहाजीराजे भोसले
इंदापूर तालुक्यामध्ये कोरोना संसर्ग खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे . इंदापूर पंचायत समिती व इंदापूर नगरपरिषद यांच्यामार्फत माननीय हर्षवर्धन पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्यातील जनता कर्फ्यू कालावधीमध्ये सर्व ग्रामपंचायत व नगरपरिषदे च्या कार्यक्षेत्रामध्ये आरोग्य कर्मचारी , आशा वर्कर , शिक्षक यांच्यामार्फत घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे .
त्याच अनुषंगाने आज दि . १२-०९-२०२०२ पासून पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद , नगराध्यक्ष अंकिता शहा , गट विकास अधिकारी विजयजी परीट , नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ठेंगल यांच्या समवेत इंदापूर येथे जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी चालू असलेल्या सर्वेक्षणाचा आढावा घेतला .
पहिल्या टप्प्यात इंदापूर नगर परिषदेमार्फत आरोग्य कर्मचारी , शिक्षक , आरोग्य सेविका यांनी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन ऑक्सी मीटर , पल्स मीटर व थर्मामीटरच्या सहाय्याने नागरिकांची आरोग्य तपासणी करायला सुरुवात केली आहे . जे नागरिक तपासणीवेळी ज्या- ज्या नागरिकांना कोरोणाचे सिम्पटम्स दिसतील त्या नागरिकांची स्लॅप टेस्टिंग करण्यात येणार आहे . जेणेकरून भविष्यात वाढणार धोका टळेल , असे प्रसंगी अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले .