गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय नगरसेवकांची मागणी
दहिवडी : ता.२८
दहिवडी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सागर पोळ, मुख्याधिकारी कपिल जगताप यांच्यासह रोखपाल सचिन कदम या तिघांनी २.५०कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप करत दहिवडी नगरपंचायतीच्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस प्रशासनाला दिलेल्या पत्रात केली आहे.
पोलीस प्रशासनाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी दिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, नगराध्यक्ष सागर पोळ यांनी मुख्याधिकारी कपिल जगताप व रोखपाल सचिन कदम यांच्याशी संगनमत करत एचडीएफसी बँकेच्या दहिवडी शाखेत दहिवडी नगरपंचायतीचे २,५०,००,०००(दोन कोटी पन्नास लाख)वरून आयसीआयसीआय बँकेच्या दहिवडी शाखेत वर्ग केले.
याचे कारण ५८(२) नुसार कार्यवाही करण्याबाबत असणारा आदेश नगराध्यक्ष पोळ यांनी मुख्याधिकारी कपिल जगताप यांच्या नावे केला. वास्तविक सदरचा आदेश करण्यापूर्वी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी नगरपंचायतीच्या नगरसेवकांची सभा घेतली नाही किंवा पूर्व कल्पनाही दिली नाही. याउलट त्यांनी संगनमत क्ररुन आयसीआयसीआय बँकेच्या दहिवडी शाखेला आर्थिक फायदा मिळवून देनेच्या उद्देशाने एचडीएफसी बँक खात्यावरील रक्कम आयसीआयसीआय बँकेच्या खात्यावर रोखपाल सचिन दिलीप कदम यांच्या मदतीने वर्ग केलेली आहे. नगरपंचायतीची फसवणूक करून बेकायदेशीरपणे रक्कम वर्ग केलेली आहे. त्यासाठी कोणताही ठराव घेण्यात आलेला आहे एवढेच नाही तर दि.०२ डिसेंबर २०२३ रोजी स्थायी समितीची सभा झाल्यानंतर त्यांनी संगनमत करून एनवेळेचा विषयात विषय टाकून बँक खाते वर्ग करण्यास सभा मान्यता देत आहे, असा बनावट प्रोसिडिंगचा कागदोपत्री पुरावा तयार केला असल्याचा आरोपी सर्वपक्षीय नगरसेवकांनी दिलेल्या पत्रात केला आहे. सभेमध्ये बँक खाते वर्ग करण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नव्हती. तसेच या पत्रावर सह्या करणाऱ्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी या गोष्टीस मान्यता दिली नव्हती. त्यामुळे नगराध्यक्ष सागर पोळ , मुख्याधिकारी कपिल जगताप आणि रोखपाल सचिन कदम यांनी केलेल्या या अडीच कोटी रुपयांच्या अपहाराची सखोल चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी दहिवडी नगरपंचायतीच्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी पोलीस प्रशासनाला दिलेल्या पत्रात केली आहे.






















