महाराष्ट्र न्यूज फलटण प्रतिनिधी :
फलटण तालुक्यामध्ये यावर्षी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळे पूरग्रस्त व अतिवृष्टी परिस्थिती निर्माण झाली व त्यामुळे तालुक्यातील साडेचार हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची माहिती सातारा जिल्हा भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर व आमदार जयकुमार गोरे यांना दिली आहे.तसेच सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची गरज असल्याचे निवेदन दिले आहे.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी प्रवीण दरेकर साहेब सातारा जिल्हा दौऱ्यावर आले होते फलटण तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कांदा ,बाजरी, सोयाबीन, ऊस ,व फळबागा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .नदी लगत चे बंधारे खाली असणारे जमिनी वाहून गेले आहेत पिकांचे नुकसानी बरोबरच जमिनीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकर्यांनी कष्टाने उभ्या केलेल्या जमिनीतील माती पावसामुळे वाहून गेली आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे . याबाबत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सुद्धा अधिकाऱ्यांच्या बरोबर याबाबत चर्चा केली आहे शेतकऱ्यांना पिकासाठी हेक्टरी 50 हजार रुपये व फळबागासाठी १ लाख रुपये सरसकट नुकसान भरपाई द्यावी .रोजगार हमी वरील मजुरांना ५०० रुपये मजुरी द्यावी मागेल .त्याला शेततळे योजनेअंतर्गत पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना तातडीने अनुदान द्यावे. तसेच फळबाग लागवड योजनेचा निधी तातडीने शेतकऱ्यांना मिळावा अशा अनेक बाबींचे निवेदन प्रवीण दरेकर यांना देण्यात आले आहे यावेळी उपाध्यक्ष मनोज कलाटप , किसान मोर्चा चे अध्यक्ष शंकर दडस ,युवा नेते सिद्धार्थ गुडगे उपस्थित होते