महाराष्ट्र न्यूज सातारा ।
मौजे तासगाव ता सातारा येथील आमदार शशिकांत शिंदे मित्र समूह यांच्यावतीने तासगाव गावांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अर्सेनिक अल्बम ३० होमीओपॅथी गोळयांचे आणि कापडी मास्क चे घरोघरी जाऊन गावातील ग्रामस्थांना वाटप करण्यात आले.
कोरोना आजाराचे थैमान सर्वत्र सूरू असतांना तासगाव पंचक्रोशी शेजारील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता सातारा- कोरेगाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या ‘अर्सेनिक अल्बम-३०’ या होमीओपॅथी गोळयांचे आणि कापडी मास्क चे परिसरात वाटप करण्यात आले.

यावेळी आमदार शशिकांत शिंदे मित्र समूहातील अशोक ताटे पाटील, संजय रजपूत,तुषार गुरव, गणेश ताटे, दशरथ ताटे, विजय माने, शुभम ताटे, स्नेहशील ताटे, सौरभ चव्हाण, कार्तिक ताटे, प्रविण जाधव, किरण ताटे, आशुतोष जाधव, आकाश ताटे, आनंदा माने, अनिकेत कांबळे, गणेश माने, शिवाजी माने, प्रशांत निकम, साहिल मुलाणी, रहिम मुल्ला, शुभम माने, विनोद काळभोर, आयमद मुल्ला, मोशीम डांगे, विकास भंडलकर, महेश तांबे, इत्यादी मित्र समूहातील कार्यकर्त्यांनी यावेळी घरघरात जाउन या औषधीचा उपयोग व कशा प्रकारे ही औषधी घ्यावयाची माहिती दिली. तासगाव पंचक्रोशी मध्ये सध्या तरी कोरोनाचा शिरकाव नसल्याने, पुढेही कोरोनाचा शिरकाव होऊ न देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आल्याचे सांगीतले.























