दहिवडी : ता.१४
मार्डी या ठिकाणी मुक्कामी असलेल्या बसच्या चालक आणि वाहकांच्या रात्रीच्या निवासाची सोय करण्यात आली असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थ रोहित पोळ यांनी दिली.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निवासी मुख्यालयामध्ये विद्यमान सरपंच संजीवनी पवार यांच्या शिफारशीने ही सोय करण्यात आली आहे.
त्या ठिकाणी आधीचे न भरलेले विज बिल भरून नवीन वीज कनेक्शन जोडण्यात आले आहे. यापुढेही हे वीजबिल सार्वजनिक वर्गणीतून भरवण्यात येणार आहे, असे ही पोळ यांनी सांगितले.
बस चालक ,वाहक यांच्या निवासाची सोय झाली असून मार्डीमध्ये असणारी मुक्कामी बस बंद होणार नाही. त्याचबरोबर सकाळी शाळा आणि कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची ही गैरसोय होणार नसल्याने स्थानिक ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी संबंधितांना धन्यवाद दिले आहेत, असे रोहित पोळ यांनी सांगितले आहे.






















